18 September 2020

News Flash

महाडीकांना काँग्रेसबरोबर राहण्यास सांगूनही निवडणुकीत दाखल – पतंगराव कदम

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या भल्यासाठी नव्या दमाच्या तरुणांना पाठिंबा देवून महाराष्ट्र उभा करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन डॉ. पतंगराव कदम यांनी येथे केले.

सतेज पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात काँग्रेस नेते डॉ.पतंगराव कदम यांनी मार्गदर्शन केले.

काँग्रेस पक्षाच्या बठकीत महादेवराव महाडीकांनी स्पष्टपणे काँग्रेस बरोबर रहावे असे सांगूनही विधानपरिषद निवडणुकीचा खेळ रंगत चालला आहे. सतेज पाटील यांना उमेदवारी मिळालेली असल्याने त्यांना विजयी करा. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या भल्यासाठी नव्या दमाच्या तरुणांना पाठिंबा देवून महाराष्ट्र उभा करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनी येथे केले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारांचा मेळावा येथील ड्रीम वर्ल्ड मध्ये पार पडला. या मेळाव्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसह उमेदवारी अर्ज भरलेले प्रकाश आवाडे, राजेखान जमादार, अशोक जांभळे उपस्थित राहून त्यांनी पाटील यांना पािठबा दिला. यावेळी कदम म्हणाले की, देशातील व राज्यातील परिस्थिती बदलत आहे. एका आमदारकीच्या निवडीचा विषय नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाचा विषय आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना चांगल्या मताने निवडणून द्यावे.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादीने काँग्रेसला पािठबा देण्याची भूमीका या पूर्वीच स्पष्ट केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेचे आमिष दाखविले तरी लोकभावना व विश्वासार्हता महत्त्वाची मानली. जनसुराज्यचे विनय कोरे यांच्याशीही चर्चा करणार असून तेही काँग्रेसला पािठबा देतील. प्रकाश आवाडे म्हणाले की, पक्षाचा निर्णय होईपर्यंत उमेदवारी मागणे हे कार्यकर्त्यांचे काम आहे. त्याप्रमाणे मी प्रयत्न केले. पण आता पक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेणार नाही. सतेज पाटील यांना पूर्ण ताकदीनिशी पािठबा देऊन निवडणुकीचा चांगला निकाल पहायला मिळेल.
उमेदवार सतेज पाटील यांनी दोन्ही काँग्रेसनी एकत्रित येऊन पाठिंबा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन विधानपरिषदेच्या आमदारकीतून जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांच्या हक्काबाबत व निधीबाबत चांगले काम करुन दाखवू. मत घेऊन गेल्यानंतर परत भेटलोच नाही असे होणार नाही. दर तीन महिन्यांनी वैयक्तिक भेटी गाठी ठेवण्याची ग्वाही दिली. समरजीत घाटगे, अरुण इंगवले, पक्षनिरीक्षक रमेश बागवे, पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील, मदन कारंडे, के. पी. पाटील, धर्यशील माने, विद्याताई पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांची अनुपस्थिती
पी. एन. पाटील अनुपस्थितीबाबत सतेज पाटील यांना खुलासा करावा लागला. ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष मुंबईत असून त्यांनी फोनवरुन याची माहिती दिली असल्याने गरसमज नको. तर मुश्रीफ यांनी मानसिंग गायकवाड, राजेंद्र पाटील यड्रावकर, ए. वाय. पाटील, निवेदिता माने हे शरद पवार यांच्या वाढदिवस कार्यक्रमात सहभागी झाल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 2:25 am

Web Title: patangrao kadam criticises mahadeorao mahadik
टॅग Patangrao Kadam
Next Stories
1 पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना लढण्याची प्रेरणा दिली
2 देशातील ८० टक्के दुचाकींचे काबोरेटर्स इचलकरंजीत बनतात
3 सतेज पाटील, महाडिक यांच्यात थेट लढत
Just Now!
X