07 December 2019

News Flash

कोल्हापूर जिल्हा बँकेकडून आता थकबाकीदारांच्या नावाचे फलक

बडय़ा थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांचे मध्यवर्ती ठिकाणी फलक लावले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

बडय़ा थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांचे मध्यवर्ती ठिकाणी फलक लावले आहेत. थकित कर्जाच्या वसुलीसाठी तुरंबे (तालुका राधानगरी) व नागाव (तालुका हातकणंगले) येथे जिल्हा बँकेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.

तुरंबे येथील शाहू मार्केट यार्ड नागरी सहकारी पतसंस्था थकबाकीदार आहे. ३१ डिसेंबर २००२ पासून ही संस्था थकबाकीत आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर या संस्थेकडे दोन कोटी ७७ लाख रुपयांचे थकित कर्ज आहे. या संस्थेचे बहुतांशी संचालक तुरंबे गावातीलच आहेत.

या मंडळामध्ये २०जणांच्या नावांचा समावेश आहे. नागाव येथील नवहिंद नागरी सहकारी पतसंस्थेचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. या संस्थेकडे ३० सप्टेंबर २०१८  अखेर दोन कोटी २७  लाख इतकी थकबाकी आहे. या संस्थेत ही स्थानिक संचालक मंडळ कार्यरत असलेल्या अकरा जणांच्या नावांचा समावेश आहे.

सात वर्षांची प्रशासकांची कारकीर्द जाऊन पावणे चार वर्षांपूर्वी विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाकडे सत्ता आल्यानंतर बँक पूर्वपदावर आणण्यासाठी संचालक मंडळाने कडक धोरण स्वीकारले. थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल—ताशांचा गजर केला. फलकांच्या माध्यमातूनही बँकेने ही रक्कम व त्यावरील भरणा तारखे अखेरचे व्याज भरण्याचे जाहीर आवाहन करून बँकेस सहकार्य करण्याची विनंती केली आहे. थकबाकीदार संस्थानी सहकार्य न केल्यास वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

First Published on February 6, 2019 1:42 am

Web Title: plot of the name of the banker from kolhapur district bank
Just Now!
X