News Flash

पोलीस अधिकाऱ्याने घेतली वारणा नदीत उडी; त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

सलग दोन वेळा बदली झाल्याने होते त्रस्त

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कोल्हापूरमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या एका अधिकाऱ्याने बुधवारी वारणा नदी उडी टाकली. मात्र, त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आलं. अधिकाऱ्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नदीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप काळे असं सहाय्यक पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. काळे हे गेली अडीच वर्ष हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षात एकही वरिष्ठ अधिकारी दीर्घकाळ सेवा करू शकले नव्हते. काळे यांनी वडगावची परिस्थिती नियंत्रणात आणत कार्यकालही पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांची बदली पोलीस मुख्यालयात झाल्याने ते निराश झाले होते.

मात्र, त्यानंतर तेथूनही त्यांची बदली कोल्हापूर विमानतळावर करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा बदली झाल्याने त्यांच्यातील खदखद व्यक्त होत होती.समाज माध्यमातून त्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली होती. मात्र त्याची दखल घेतली नसल्यानं नाराजी कायम होती. या नैराश्यातूनच त्यांनी आज चिकुर्डे (तालुका वाळवा) येथील वारणा नदी उडी मारली. हा आत्महत्येचा प्रकार असल्याची चर्चा आहे. तर मद्य प्राशन केल्याने ते नदीत पडल्याचंही बोललं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 5:53 pm

Web Title: police officer attempt to suicide api kolhapur police bmh 90
Next Stories
1 अडचणीतील दूध महासंघाच्या नेत्यांकडून ‘गोकुळ’ सक्षम करण्याची भाषा!
2 कौमार्य परीक्षा घेत जातपंचायतीद्वारे घटस्फोट
3 साठा संपल्याने लसीकरण बंद
Just Now!
X