कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक साखळी उपोषण सुरू असताना मंगळवारी हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांची भेट घेऊन हद्दवाढीविरोधात निवेदन देण्यात आले. हद्दवाढ मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला ग्रामीण भागातून विरोध वाढत चालला आहे. राज्य शासनाला कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीचा अहवाल पाठविताना जिल्हाधिकारी विश्वासात न घेतल्याने गेल्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळून हद्दवाढीला विरोध करण्यात आला. त्याचाच पुढील टप्पा म्हणून सोमवारपासून कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
तर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांची भेट घेऊन कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. ग्रामीण भागावर अन्याय करणारी हद्दवाढ मागे घेण्यात यावी. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्यात महापालिका अपयशी ठरणार असल्याने ग्रामीण जनतेचा विरोध राहणार आहे. दबाव टाकून हद्दवाढ केल्यास आणखी उग्र आंदेलन करण्यात येईल, असे आंदोलकांनी चच्रेवेळी स्पष्ट केले. चच्रेमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील, प्रवक्ते नाथाजीराव पोवार, यांच्यासह प्रतिनिधी सहभागी झाले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी साखळी उपोषण सुरू ‘एक इंचही जागा देणार नाही’, ‘पहिल्यांदा आपला कारभार बघा’, ‘हद्दवाढ कुणासाठी? बिल्डर की कारभाऱ्यांसाठी.’, ‘कारभाऱ्यांनो, गेल्या वर्षांतील निधींची श्व्ोतपत्रिका जाहीर करा.’, ‘देणार नाही, देणार नाही  इंचही जागा देणार नाही.’, अशा घोषणा केल्या जात होत्या.