News Flash

केंद्राने दूध पावडर, लोण्याचा साठा करावा – शरद पवार

गोकुळ दूध संघाची निवडणूक नुकतीच पार पडली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर : राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे दूध संघ आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने दूध पावडर व लोण्याची खरेदी करून राखीव साठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली. तसेच यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही पवार म्हणाले.

गोकुळ दूध संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर नूतन संचालकांनी पवार यांची आज भेट घेतली. या वेळी पवार यांच्याशी संघाचे अध्यक्ष विश्वाास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दुग्धव्यवसाय बाबत चर्चा केली. पाटील यांनी गोकुळच्या प्रगतीची माहिती देताना दुग्ध व्यवसायातील अडचणी विशद केल्या.

करोना टाळेबंदी सुरू असल्यामुळे राज्यातील सर्वच दूध संघ आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यात दररोज सुमारे दोन कोटी लिटर दूध उत्पादन होत आहे. यामध्ये सहकारी दूध संघांचे प्रमाण ४० टक्के आहे. टाळेबंदीमुळे हॉटेल, मिठाई व्यवसाय तसेच घरगुती दूध विक्री यामध्ये लक्षणीय घट झाल्याने शिल्लक दूध साठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिल्लक दुधापासून भुकटी, लोणी बनवावे लागत आहे. त्यालाही चांगला दर मिळत नसल्याने सहकारी दूध उत्पादक संघ अडचणीत आले आहेत. या पार्श्वाभूमी भूमीवर  पवार यांनी याप्रश्नी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:02 am

Web Title: problem excess milk state serious former union agriculture minister sharad pawar akp 94
Next Stories
1 आरक्षण प्रश्नी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात
2 केंद्राचा साखर उद्योगाला दिलासा!
3 कोल्हापुरात दुकाने बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर
Just Now!
X