News Flash

खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकर अनुदान घोषित करावे.

चंद्रकांत पाटील यांची केंद्राकडे मागणी

कोल्हापूर : खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री  नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे पत्राद्वारे केली.

पाटील यांनी मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेले वर्षभर करोना महासाथ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकर अनुदान घोषित करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पाटील यांनी भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही पत्र पाठविले असून शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:04 am

Web Title: provide subsidy to farmers for purchase of fertilizers akp 94
Next Stories
1 नरेंद्र मोदींना शेतकरी लिहिणार पत्र; स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार
2 कडक टाळेबंदीला कोल्हापुरात प्रतिसाद, विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
3 पावसाळ्याच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ
Just Now!
X