24 January 2020

News Flash

पुणे- बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक पंचगंगेच्या पुराने ठप्प

कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊ स सुरू असून पंचगंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे.

पंचगंगेच्या पुराचे पाणी कोल्हापूरजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर आल्याने हा महामार्ग मंगळवारी वाहतुकीसाठी बंद होता.    छाया : साईनाथ जाधव.

कोल्हापूर जिल्ह्यमध्ये मुसळधार पाऊ स पडत असल्याने पंचगंगा नदीला महापूर येऊ न त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. कोल्हापूर शहराजवळ या नदीचे पाणी मंगळवारी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आल्याने हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या मार्गावरून अखंडित सुरू असणाऱ्या वाहतुकीला प्रथमच ‘ब्रेक’ लागला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊ स सुरू असून पंचगंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे.  कोल्हापूर शहराजवळ शिरोलीजवळ पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला पंचगंगा नदी ओलांडते. मंगळवारी  पंचगंगा नदीचे पुराचे पाणी  शिरोलीजवळील पुलावरून जात महामार्गावर आले. पाहता पाहता या पाण्याचीही उंची वाढू लागल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूकडून वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महामार्गावर पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक बंद असल्याचा फलक लावला असून लोखंडी कठडे लावून शिरोलीजवळ वाहतूक रोखली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रवाशांना पुढे व मागे जाण्याचा मार्ग खुंटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. महामार्ग बंद झाल्याने प्रवाशांनाही मोठय़ा संख्येने अडकून पडावे लागले होते. दरम्यान पंचगंगेपाठोपाठ  वारणा नदीच्या पाण्याच्या फुगवटय़ामुळे किणी टोल नाक्यावरही पाणी साचले आहे. त्यामुळे या ठिकाणीही वाहतूक थांबवली गेली आहे. पाण्याचा हा प्रवाह ओसरल्यावरच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार असल्याने नागरिकांनी या मार्गाचा प्रवासासाठी वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on August 7, 2019 2:36 am

Web Title: pune bangalore highway traffic due to panchanganga flood abn 97
Next Stories
1 सांगली: कृष्णा नदीला महापूर, ८० गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती
2 कोल्हापूर : शिरोली भागात पुरामुळे पुणे-बंगळूरू महामार्ग बंद
3 पूरस्थिती गंभीर, मुख्यमंत्र्यांनी दौरा स्थगित करुन कोल्हापूरला भेट द्यावी : हसन मुश्रीफ
Just Now!
X