मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली.मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी महाराष्ट्रात लाखोंच्या जनसमुदायाने मराठा समाजाच्या वतीने मूक मोच्रे निघत आहेत. या पाश्र्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली.

[jwplayer 19exw8V5]

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
akola registers highest temperature in Maharashtra
उन्हाच्या तडाख्यामुळे पारा ४१ अंशांवर, किती दिवस राहणार उष्णतेच्या झळा?

लोकसभेत त्यांनी म्हटले, की महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पाटीदार (पटेल), राजस्थानात गुर्जर आणि पश्चिमी, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाबमध्ये जाट अशी या परिसरातील जनता आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र सोडून उर्वरित राज्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावर िहसक घटना घडलेल्या आहेत.

महाराष्ट्रात दोन महिन्यांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्दय़ावर प्रचंड मोच्रे निघत आहेत. आंदोलकांची मागणी योग्य व न्यायपूर्ण अशीच आहे. या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे.

त्या कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यावे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यात याव्यात. आíथक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फीमध्ये सवलत देण्यात यावी. त्याचबरोबर मराठा समाजातील लोकांना नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे. या मागण्या त्वरित मान्य करून याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी अतिशय कमी निधीची तरतूद करावी लागणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाज, शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे, असे खा. शेट्टी यांनी सांगितले.

[jwplayer psUg1N0g]