05 August 2020

News Flash

भाजप कोल्हापूर शहराध्यक्षपदी चिकोडे; जिल्हाध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे

भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचा कार्यक्रम पार पडला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाने नवे पदाधिकारी निवडताना युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी राहुल चिकोडे यांची तर भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे यांची निवड करण्यात आली आहे. हे दोघेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे जवळचे आणि लाडके कार्यकर्ते मानले जातात.

कोल्हापूर भाजप महानगर अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेत होती. प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांच्यासह काहींनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यामध्ये चिकोडे यांनी बाजी मारली. चिकोडे हे चंद्रकांत पाटील मंत्री असताना त्यांचे स्वीय सहायक होते. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी कागलचे शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके हे होते. निवडीनंतर चिकोडे यांनी कोल्हापूर शहरात भाजपची भक्कम बांधणी करणार असल्याचे सांगितले. तर घाटगे यांनी संघटनेचे काम कल्पकतेने करण्याचा इरादा व्यक्त केला. नव्या संकल्पना घेऊ न येणाऱ्या कार्यकर्त्यांंना प्रोत्साहित करून भाजपचे काम सक्षमपणे करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचा कार्यक्रम पार पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 4:02 am

Web Title: rahul chikode appoint bjp kolhapur city president zws 70
Next Stories
1 कोल्हापूरचे अ‍ॅड. अमित बोरकर उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश
2 गोकुळची दूध खरेदी दरात वाढ
3 कोल्हापुरातील मटण दराचा प्रश्न सुटला
Just Now!
X