News Flash

कोल्हापुरातील पावसाची गती कायम; पंचगंगेच्या पातळीत तीन फुटांनी वाढ

कोल्हापूर जिल्ह्यतील पाणलोट क्षेत्रातील पावसाची गती कायम आहे. शहरासह पूर्वेकडील भागात शुक्रवारी पावसाची उघडझाप सुरू होती.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ पहाटे दोन वाजता झाला.

नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा भक्तांविना

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यतील पाणलोट क्षेत्रातील पावसाची गती कायम आहे. शहरासह पूर्वेकडील भागात शुक्रवारी पावसाची उघडझाप सुरू होती. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यत आजही जोरदार पाऊस झाला. पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे पंचगंगा, ताम्रपर्णी, कुंभी, कासारी, भोगावती या नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरात आज पावसाची उघडझाप सुरू होती. येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये तासाला दोन इंच याप्रमाणे वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत तीन फूट पाणीपातळी वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावर आज सायंकाळी पाणीपातळी ३३ फूट ४ इंच होती. एकूण ५६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ही संख्या एकने वाढली आहे. कासारी नदीवरील वालोली, बाजार भोगाव तसेच वेदगंगा नदीवरील करडवाडी येथील बंधारा खुला झाला आहे.

नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज पहाटे पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. निम्म्याहून अधिक मंदिर कृष्णा नदीच्या पाण्याखाली आहे. नदीची पातळी कालपासून पंधरा ते वीस फुटांपर्यंत वाढली आहे. नदीचे पाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे श्री चरण कमलावरून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. करोना महामारीमुळे दर्शन बंद असल्यामुळे भाविकांना पर्वणी स्नानाचा आनंद लुटता आला नाही, अशी खंत दत्त देवस्थानचे माजी सचिव विनोद पुजारी यांनी व्यक्त केली. सीसीटीव्ही वरून भाविक दत्त दर्शन घेत होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 1:03 am

Web Title: rainfall kolhapur continues increase three feet panchganga ssh 93
Next Stories
1 कोल्हापुरात पावसाचे जोरदार आगमन
2 मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात मूक आंदोलन
3 कृष्णा कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडी?
Just Now!
X