रामदास आठवले यांचे प्रतिपादन

संविधानात आवश्यक ते बदल करून हा बदल संसदेत मंजूर केल्याशिवाय मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे झालेल्या मराठा दलित ऐक्य परिषदेत व्यक्त केले.

मराठा समाजाचे मोच्रे, यातून आरक्षणासह ‘अ‍ॅट्रॉसिटी’बाबत निर्माण झालेले गरसमज आणि दलित समाजातील भीती या पाश्र्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने (आठवले गट) येथे मराठा-दलित ऐक्य परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी आठवले बोलत होते.

या परिषदेस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, की आजवर मराठय़ांनीच मराठय़ांच्या विरोधात दलितांकरवी ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गरवापर केला आहे. दलित समाजाकडून असा गरवापर होत नाही आणि होणार नाही याची आम्ही हमी देऊ. पण त्यासाठी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करावा अशी मागणी कुणी करू नये. चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘अ‍ॅट्रॉसिटी’, आरक्षणबाबत गरसमज दूर झाले पाहिजेत. शासन यासाठी सक्षम आहे.