19 January 2020

News Flash

नगरसेवक बंधू तेलनाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा

सुनील तेलनाडे, सागर कचरे व अमित सिंग यांनी पुजारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : खोटय़ा सातबाराद्वारे जमीन खरेदी करून त्या जागेतून वाहतूक करण्यासाठी २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीतील नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे याच्यासह पाच जणांच्या विरोधात बुधवारी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्याचा भाऊ , नगरसेवक सुनील तेलनाडे, वकील अमित सिंग, सागर कचरे व कबनूर तलाठी एस. बी. सुतार यांचा समावेश आहे.

या प्रकरणी धुळाप्पा अप्पा पुजारी (वय ६२, रा. चंदूर) यांनी फिर्याद दिली आहे. तब्बल सात वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणाचा तपास करून या टोळीवर मोका लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. कबनूर गावातील गट नं. ‘६५८ अ’ ही उदय मोरे, मानाजीराव चव्हाण आणि बापू चव्हाण यांच्या मालकीची शेतजमीन सन २००० मध्ये धुळाप्पा पुजारी यांनी कराराने कसायला घेतली आहे.

मात्र संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे यांनी कबनूर तलाठी सुतार यांच्या संगनमताने या मिळकतीचा खोटा सातबारा तयार करून मूळ वारसांपैकी चव्हाण बंधूंना मोठय़ा रकमेचे आमिष दाखवून सन २०१२ मध्ये ती खरेदी केली.

या संदर्भात पुजारी अथवा मोरे यांची कोणत्याही प्रकारची संमती घेतली नाही. खरेदीनंतर ही मिळकत पुजारी यांच्याकडे कसायला असल्याने कायदेशीरपणे ती जागा आपल्या कब्जात येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर सुनील तेलनाडे, सागर कचरे व अमित सिंग यांनी पुजारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. सन २०१२ पासून यंदाच्या फेब्रुवारीपर्यंत हा प्रकार सुरू होता. तेलनाडे याने खरेदी केलेल्या मिळकतीतून ऊ स व पीक वाहतूक करण्यासाठी पुजारी यांच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

शहर व परिसरात तेलनाडे याची दहशत असल्याने पुजारी यांनी या प्रकरणाची आजतागायत कोठेही वाच्यता केली नव्हती. मात्र, तेलनाडे बंधूंच्या टोळीवर ‘मोका’ची कारवाई केल्यानंतर पोलिस दलाच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार पुजारी यांनी तRोर दाखल केली आहे. तेलनाडे टोळीविरुद्ध अन्य कोणाच्या तRोरी असतील त्यांनी निर्भयपणे पुढे येऊ न तRोरी कराव्यात, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.

First Published on May 23, 2019 4:17 am

Web Title: ransom offense against corporator telenade and brother
Next Stories
1 कोल्हापुरात निकालाबद्दल कुतूहल, हुरहुर आणि धास्ती!
2 नगरसेवक बंधू तेलनाडे यांच्यासह टोळीवर इचलकरंजीत मोका कारवाई
3 २५ लाख रुपयांच्या खंडणी वसुलीसाठी मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
Just Now!
X