22 November 2019

News Flash

रेशन व रॉकेल दुकानदारांचा आज विधान भवनावर महामोर्चा

राज्यातील सर्व रेशन व रॉकेल दुकानदारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या (सोमवारी) विधान भवनावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आझाद मदान ते विधान भवन असा

राज्यातील सर्व रेशन व रॉकेल दुकानदारांच्या वतीने विविध मागण्यांसाठी उद्या (सोमवारी) विधान भवनावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आझाद मदान ते विधान भवन असा काढण्यात येणार आहे. या वेळी फेडरेशनच्या वतीने संबंधित खात्याकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात ५५ हजार किरकोळ परवानाधारक रॉकेल विक्रेते असून या सर्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशन संघटनेव्दारे केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार केवळ परवानाधारकांना गहू, तांदूळ व फक्त बीपीएल अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणारा लेव्ही साखरेच्या कोटय़ाचासुध्दा व्दारपोच योजनेत समावेश करावा, हमाली मिळावी. सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने राज्यात अन्न महामंडळ स्थापन करावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या बाबी लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

First Published on April 4, 2016 1:20 am

Web Title: ration and kerosene retailers rally on vidhan bhavan
Just Now!
X