कोल्हापूर : तगडय़ा स्पर्धकांत बाजी मारत गोकुळचे अध्यक्षपद रवींद्र पांडुरंग आपटे यांनी सोमवारी पटकावले. त्यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आठ वर्षांंपूर्वी आपटे यांनी दोन वर्षांसाठी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. गोकु ळला प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच आर्थिक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

आज गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली होती. अध्यक्षपदासाठी आपटे यांचे नाव मावळते अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सुचविले, त्यास ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी अनुमोदन दिले.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?
Parshottam Khodbhai Rupala
मोले घातले लढाया: उमेदवारी वादात
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

सोमवारी महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी अध्यक्षांचे नाव असलेले बंद पाकीट अध्यक्षांचे स्वीय सहायक संजय दिंडे यांच्या मार्फत ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्याकडे दिले. त्यांनी सभेत अध्यक्ष पदाचे नाव वाचून दाखवल्यानंतर रवींद्र आपटे यांनी अर्ज दाखल केला. एकमात्र अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. या वेळी आजरा तालुक्यातील आपटे समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष केला.

निवडीनंतर रवींद्र आपटे यांनी आव्हानांना भिडण्याची तयारी दर्शवली. गाईचे अतिरिक्त दूध हा चिंतेचा विषय आहे. त्यापासून चॉकलेट, बिस्कीटसह इतर उपपदार्थ तयार करण्याचा मनोदय आहे. गोकुळला बहुराज्य दर्जाची मंजुरी मिळवली जाईल, असे आपटे म्हणाले.कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी आभार मानले.

चुयेकरांचे विस्मरण

आज अध्यक्ष निवड पार पडल्यानंतर संचालकांनी मनोगत व्यक्त करताना रवींद्र आपटे यांना सहकार्य करण्याची भूमिका मांडतानाच दूध व्यवसायासमोरील अडचणींचा ऊहापोह केला.  मात्र,त्यापैकी कोणालाही गोकु ळला ऊर्जितावस्था आणणारे दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे स्मरण करावेसे वाटले नाही. अपवाद ठरला तो माजी अध्यक्ष अरूण नरके यांचा. त्यांनी चुयेकरांनी दाखवलेल्या यशाच्या वाटेने जाण्याची गरज व्यक्त केली.