News Flash

‘ऑनर किलिंग’ घटनेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या

इंद्रजित-मेघा कुलकर्णी दाम्पत्याच्या ऑनर किलिंग घटनेवर शहरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

इंद्रजित-मेघा कुलकर्णी दाम्पत्याच्या ऑनर किलिंग घटनेवर शहरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. इंद्रजित कुलकर्णी वे मेघा कुलकर्णी यांच्या ऑनर किलिंग प्रकरणी नामांकित सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, दोषारोपपत्र त्वरित  दाखल करुन सुनावणी अंडर ट्रायल घ्यावी,  या मागणीचे निवेदन शहीद गोिवद पानसरे विचार मंचसह सावर्डे ग्रामस्थांनी गृह पोलीस उपाधीक्षक अनिल पाटील यांना शनिवारी दिले. कुलकर्णी कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, आंतरजातीय विवाह करु इच्छिणाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, पोलिसांचा हलगर्जीपणा,  पक्षपातीपणामुळेच इंद्रजित व मेघाचा बळी गेला असून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.तर माकपने ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याने आरोपी व त्यांना चिथावणी देणाऱ्या मंडळींनाही सहआरोपी करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.
कुलकर्णी दाम्पत्याबाबतचे प्रकरण बांबवडे पोलिसांनी पक्षपातीपणा करुन दडपले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करुन जोडप्यांना संरक्षण दिले असते तर हे दोन खून टाळता आले असते. या खुनाचे नियोजन गेल्या वर्षांपासून सुरु होते. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. अनिल पाटील यांनी या प्रकरणातील आरोपींविरोधात सर्व पुरावे गोळा करुन त्यांना शासन केले जाईल असे आश्वासन दिले. कॉ.सतिशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, अनिल चव्हाण, सीमा पाटील, शशिकांत कुलकर्णी, रणजित कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, दिलदार मुजावर उपस्थित होते.
माकपच्या इचलकरंजी येथील कार्यालयात झालेल्या बठकीत कुलकर्णी दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध नोंदवण्यात आला. खोटय़ा, सरंजाम वृत्तीतून झालेल्या हत्येची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कडक कारवाई केली जावी, त्याशिवाय आंतरजातीय विवाहानंतर नातेवाईक निष्कारण नाक खुपसणार नाहीत, असा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला. शहर सचिव आनंदराव चव्हाण, दत्ता माने, शिवगोंडा खोत, भरमा कांबळे, जयंत बलुगडे, सदा मलाबादे, ए.बी.पाटील, सुभाष निकम, भाऊ सूर्यवंशी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 2:10 am

Web Title: reaction on honor killing incident
टॅग : Kolhapur
Next Stories
1 पुरोगामी कोल्हापूर ‘ऑनर किलिंग’बाबत शांत
2 साखर कारखान्यांकडून ‘एफआरपी’चे सूत्र मान्य
3 प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात
Just Now!
X