05 July 2020

News Flash

घरफाळा वाढीचा प्रस्ताव कोल्हापुरात फेटाळला

शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घरफाळा वाढीचा प्रस्ताव आज फेटाळून लावला. सर्वच नगरसेवकांनी पुढील पाच वर्षांत घरफाळावाढीला मान्यता देणार नाही असे ठणकावून सांगितले.

शनिवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घरफाळा वाढीचा प्रस्ताव आज फेटाळून लावला. सर्वच नगरसेवकांनी पुढील पाच वर्षांत घरफाळावाढीला मान्यता देणार नाही असे ठणकावून सांगितले. शहरातील मिळकतींची तब्बल २४ कोटी थकबाकी, घरफाळा विभागातील कर्मचाऱ्याची कामात दिरंगाई, रिव्हाईज सर्वेला लागलेला विलंब, आíथक तडजोडी यामुळे घरफाळा अपेक्षेप्रमाणे होत नसून महापालिकेचे दरवर्षी कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असल्याने घरफाळा विभागातील कामात सुधारणा करून अधिकारी कर्मचाऱ्यांनी आíथक उत्पन्न वाढवावे अशा सूचना नगरसेवकांनी केल्या.
घरफाळा वाढीच्या विषयाने आठवडाभर वातावरण तापले आहे. प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष निर्माण झाला आहे. शहरातील मिळकतीवरील घरफाळा ४० टक्के वाढ करण्याबाबतचा कार्यालयीन प्रस्ताव प्रशासनाकडून आला होता.  या पाश्र्वभूमीवर घरफाळा वाढीच्या विषयावर चर्चा करताना नगरसेवकांनी घरफाळा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आयुक्तांना लक्ष्य केले. सध्या घरफाळ्याची थकबाकी २४ कोटीवर असून अनेक मिळकतीवर घरफाळाच लागू केलेला नाही. तसेच काही मिळकतधारांकडे कर्मचारी जाऊन घरफाळा वसूल न करता आíथक तडजोडी करून स्वत:चा फायदा करतात. असा आरोप शारंगधर देशमुख, भूपाल शेटे यांनी केला. सुरेखा शहा यांनी प्रत्यक्ष ५० कोटीच्यावर असलेली थकबाकी हिम्मत असेल तर वसूल करा, असे आव्हान देऊन वसूल झाल्यास अधिकाऱ्यांचा सत्कार करू असे स्पष्ट केले. तौफिक मुल्लाणी यांनी थकबाकीदारांना दंड व्याजामध्ये सवलत दिली जाते. पण ज्यांनी दंड व्याज भरले त्यांचे पसे परत करणार का किंवा पुढील घरफाळ्यात जमा करणार का, असा प्रश्न केला.
घरफाळा विभाग अधिकारी दिवाकर कारंडे यांनी सांगितले की, २००३ नंतर शहरातील मिळकतींचा रिव्हजन सर्वे केला नाही. घरफाळा आकारणी सुधारित करण्यासाठी २०१६ पासून अमलात येणाऱ्या घरफाळ्यासाठी ही वाढ सुचविण्यात आली आहे. याबाबत ज्या तारखेपासून बांधकामास परवानगी दिली. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर किंवा एकवर्ष पूर्ण झाल्यावर घरफाळा आकारणी सुरू केली पाहिजे. काही कर्मचारी ठराविक मिळकतधारकांकडे जाऊन आíथक तडजोडी करून परस्पर वसुली न करता पसे खातात असे म्हणत त्यांनी या विभागाचा पोलखोल केला.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी कराची पुनर्आकारणी करताना जास्तीत जास्त ४० टक्क्यापर्यंत वाढ करण्याबाबत निर्देश असल्यामुळे ४० टक्क्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. भूपाल शेटे यांनी फेयरडिलने महापालिकेवर लावलेल्या ४५९ कोटीच्या दाव्याबाबत लवादाकडे खटला सुरू आहे. त्यासाठी महापालिकेचे कोटय़ावधी रुपये खर्च झाले आहेत. पण वकिलांकडून मात्र काहीही काम झालेले नाही. तरीही एका वकिलास ४० लाख रुपये फी दिली आहे. यापुढे वकिलांचे पॅनेल नवीन नेमावे व त्यांच्याकडून काम करून घ्यावे अशी सूचना केली.    विषयपत्रिकेवरील आरक्षण हटविण्याबाबत, संपादनाबाबतचे प्रस्ताव काही नामंजूर तर काही पुढील मिटींगला ठेवण्यात आले तर इतर विषय मंजूर करण्यात आले.
शिवसेनेने फेकली सभागृहात पत्रके
घरफाळा विरोधात शहर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेसमोर मोर्चा आणला होता. सभेच्यावेळी प्रेक्षक गॅलरीत काही शिवसेनेचे कार्यकत्रे होते त्यांनी घरफाळ्याबाबत सभेत विषय सुरू असताना सभेत पत्रके भिरकावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2016 1:30 am

Web Title: refuse of house rent prophecy in kolhapur corporation
टॅग Corporation
Next Stories
1 कोल्हापूरमध्ये आरक्षणामध्ये १५ कोटींच्या नुकसानाची माहिती
2 कोल्हापूर हद्दवाढीला राजकीय विरोधाचे ग्रहण
3 इचलकरंजीतील आगीत ३ दुकाने जळाली
Just Now!
X