19 October 2019

News Flash

पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापुरातून अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पिस्तूल पुरवल्याचा त्याच्यावर पोलिसांना संशय होता.

तडीपार पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मन्या नागोरी याला रविवारी पहाटे कोल्हापूर येथील एका हॉटेलमधून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

तडीपार पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मन्या नागोरी याला रविवारी पहाटे कोल्हापूर येथील एका हॉटेलमधून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना हवा असलेला कुख्यात नागोरीवर पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात २० पिस्तूल तस्करीचे आणि खुनाचे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागोरीकडून आणखी पिस्तूल मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पिस्तूल पुरवल्याचा त्याच्यावर पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मनीष नागोरीला तडीपार केले होते. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना मनीष नागोरी हा हॉटेल स्कायलार्कमध्ये आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे, फौजदार संदीप जाधव, अशोक पाटील, सागर माळवे यांच्या पथकाने हॉटेल स्कायलार्क धाड टाकून नागोरी याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम १४२ नुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

First Published on April 7, 2019 6:38 pm

Web Title: revolver smuggler manish nagori arrested in kolhapur