19 September 2020

News Flash

ऋतुराज पाटील यांच्यानंतर आणखी एका काँग्रेस आमदाराला करोनाची लागण

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची करोनावर मात

राज्यात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला शहरात परसणारा करोना आता गावखेड्यातही फोफावतोय. सर्वसामान्यांसोबत राजकीय नेते व लोकप्रतिनिधी यांनाही करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूरमधील काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना करोनाची लागण झाली आहे. तीनन दिवसांपूर्वी कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता कोल्हापूर मधील आणखी एका आणदाराला करोनाचा संसर्ग झाला आहे.

कोल्हापूरमधील काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री उशीरा समोर आलं आहे. जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत करोना पॉझिटिव्ह आढळ्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी संपर्कातील व्यक्तींनाही करोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

जाधव म्हणाले की, माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. आज सायंकाळी रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.

कोल्हापूर शहर आणि ग्रामिण भागात करोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे.करोनाचा वाढत्या प्रभावामध्ये काँग्रेस आमदार जाधव यांनी शहरातील कोविड संटेरला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कोविड सेंटरमधील सुविधा, डॉक्टरांशी चर्चा आणि रुग्णांसाठीही वेळ दिला होता.

दरम्यान, इचलकरंजीचे आमदार, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी करोनावर मात केली आहे. सध्या ते स्वगृही परतले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2020 8:59 am

Web Title: ruturaj patil and one more congress mla tes positive for coronavirus nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या दहा हजारांवर
2  मंगलमय वातावरणात विघ्नहर्त्यांचे आगमन
3 कोल्हापूर उद्यमनगरी प्राणवायूअभावी संकटात
Just Now!
X