13 December 2017

News Flash

सदाभाऊंना मंत्रिपद सोडावे लागेल- राजू शेट्टी

कार्यकर्त्यांला स्पष्टपणे भूमिका मांडण्यास शिकवले असल्याने काही वेळा गरसमज होतात.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: March 21, 2017 6:04 PM

Raju Shetty : आत्मक्लेश यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला आजपासून सुरूवात झाली. ही यात्रा सकाळी चेंबूरहून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाली.

खोत यांच्या मुलाच्या प्रचाराला जाण्यास नकार; सरकारविरुद्ध शेतकरी आंदोलनाची तयारी

सत्तेचा मोह चांगला नसतो. त्यामुळे आपण सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या प्रचाराला जाणार नाही. सत्तेचा मोह असाच राहिला तर खोत यांचा पाशा पटेल होईल. आगामी शेतकरी आंदोलनावेळी खोत यांना सत्ता की संघटना याचा पर्याय निवडत मंत्रिपद सोडावे लागेल, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले.

मराठवाडय़ाच्या दौऱ्यावेळी शेट्टी यांनी घराणेशाही, मंत्री खोत यांच्या पुत्राची उमेदवारी, खोत यांचे वर्तन आदींबाबत वक्तव्य केले होते. मंगळवारी शेट्टी कोल्हापुरात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मुद्यांसह अन्य विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

घराणेशाहीला आपला पूर्वीपासून विरोध आहे, असा उल्लेख करून शेट्टी यांनी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाही कशी फोफावली आहे, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांला उमेदवारी मिळायला हवी. माझा आग्रह हा असताना आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या िरगणात उतरवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घराणेशाही आणली आहे. सत्तेचा मोह चांगला नसतो, त्यामुळे आपण खोत यांच्या मुलाच्या प्रचाराला जाणार नाही. सत्तेचा मोह असाच राहिला तर खोत यांचा पाशा पटेल होईल. संघटनेत ‘प्रति नाना पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोत यांची राज्याच्या शेतकरी चळवळीला गरज आहे. संघटनेत कसलेही गरसमज नाहीत. कार्यकर्त्यांला स्पष्टपणे भूमिका मांडण्यास शिकवले असल्याने काही वेळा गरसमज होतात.  महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिग्गज तसे म्हणत आहेत. माझा त्या बाबतचा तितका अभ्यास नाही, पण यावर आठवडाभराने भाष्य करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मित्रपक्षांच्या कारभारात भाजपकडून ढवळाढवळ

मित्रपक्षांच्या कारभारात भाजपकडून ढवळाढवळ होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सक्षम उमेदवार उभा केल्यावर राहिलेल्यापकी कोणाला तरी उमेदवारीची गळ घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत असून, ही काही फार चांगली गोष्ट नाही. भाजपने मित्रपक्षांच्या जोरावर ग्रामीण भागात हातपाय पसरले हे विसरू नये.

First Published on February 15, 2017 1:41 am

Web Title: sadabhau khot raju shetty swabhimani shetkari sanghatana