सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामापासून नेहमीच एफआरपीपेक्षा जादा ऊ स दर दिला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले.

काळम्मा बेलेवाडी -धामणे (ता. कागल) येथील संताजी घोरपडे या खाजगी कारखाना कार्यस्थळावर पाचव्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यRमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील होते. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे तेरावे वंशज श्रीमंत रानोजीराजे घोरपडे यांच्या पत्नी रत्नमालाराजे घोरपडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुश्रीफ यांनी घोरपडे आणि शेजारील साखर कारखान्याच्या उस दराची तुलना केली. ते म्हणाले, गेल्या हंगामात बिद्री कारखान्याचा उसाचा प्रतिटन दर तीन हजार रुपये होता, तर हमिदवाडा कारखान्याचा दर २९०० रुपये होता. आता सरसेनापतीचेही प्रतिटन ५० रुपये तात्काळ जमा करीत असल्याने हा दर २९००पर्यंत पोहोचेल. या हंगामात बिद्री व हमिदवाडाची एफआरपी २९०० रुपये आहे. आमचाही दर एफआरपी प्रमाणेच असेल. त्यामुळे आमचा दर एफआरपीच्या तुलनेत प्रतिटन १०० रूपये जास्तच होतो. तसेच २०१७-१८ या हंगामातील देय असलेली २०० रुपये प्रमाणे निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत. पुढील काळात दहा हजार मेट्रिक टन ऊस गाळप, प्रतिदिन ५० मेगावॅट वीज निर्मिती व प्रति दिन १ लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणे शक्य होणार आहे. स्वागत अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविक सरव्यवस्थापक महेश जोशी यांनी तर आभार संतोष मोरे यांनी मानले.