News Flash

गोकुळ’ महाडिकमुक्त करण्यासाठी मैदानात

सतेज पाटील यांचा हल्लाबोल

शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचार प्रारंभ वेळी गुरुवारी बोलताना आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील. या वेळी उपस्थित गणपतराव पाटील, खासदार संजय मंडलिक, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील, निवेदिता माने.

सतेज पाटील यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर मक्तेदारी मोडून काढून संघ महाडिक मुक्त करण्यासाठी मैदान उतरलो आहे. विजय आमचाच आहे या स्वप्नात महाडिक समर्थक गुंग झाले आहेत, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केला.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहु शेतकरी विकास आघाडीचा नृसिहवाडी (ता.शिरोळ) येथे श्री क्षेत्र दत्त देवस्थान येथे श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला.

या वेळी पालकमंत्री पाटील म्हणाले,की गोकुळ दूध संघ बहुराज्य करून संघात बाहेरचे सभासद करून आपली पुन्हा मक्तेदारी चालवायची हा मनसुबा महाडिक घराण्याचा होता. तो आम्ही सर्वांनी मिळून उधळून लावल्यानेच सभासदांना महत्त्व आले आहे. गोकुळची सत्ता दिल्यास प्रती लिटर २ रुपये दुधाला भाववाढ देऊ.

माजी खासदार निवेदिता माने, माजी गोकुळ अध्यक्ष दिलीप पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.  स्वागत दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक विश्वास पाटील यांनीं केले. आभार माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:09 am

Web Title: satej patil campaign for election of the kolhapur district cooperative milk producers institution zws 70
Next Stories
1 ‘गोकुळ’च्या उमेदवारीपासून बडी घराणी, नेते उपेक्षित
2 ..तर मुंबई, पुण्यासारखी कोल्हापूरची करोना स्थिती गंभीर – सतेज पाटील
3 ‘गोकुळ’च्या आणखी एका ठरावधारकाचा करोनाने मृत्यू
Just Now!
X