22 January 2021

News Flash

सतेज पाटील यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली

महाराष्ट्रातील विधान परिषद निकालाची माहिती

विधान परिषदेचे नूतन आमदार सतेज पाटील यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार भाई जगताप, अमरिश पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी महाराष्ट्रातील विधान परिषद निकालाची माहिती सोनिया गांधी यांना दिली. काँग्रेसच्या या विजयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, आमदार सतेज पाटील यांचे त्यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या सर्वानी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. आमदार पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मोहन प्रकाश यांचे आभार मानले. त्यावर मोहन प्रकाश यांनी आमदार सतेज पाटील यांना मिठाई भरवून त्यांचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 3:30 am

Web Title: satej patil met sonia gandhi
टॅग Kolhapur,Satej Patil
Next Stories
1 यंत्रमाग कारखान्यास मंगळवारी आग
2 ‘एफआरपी’च्या परिपत्रकाची होळी
3 कृषी प्रदर्शनात शेतक-यांना सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन
Just Now!
X