23 October 2019

News Flash

सातारा : सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील वाहतूक धोकादायक

रस्त्याचा भराव पूर्णपणे वाहून गेला असून वाहतूक बंद पडली.

परळी खोर्‍यात धुवांधार पाऊस सुरू असून गुरुवारी रात्री ठोसेघर-चाळकेवाडी रस्ता सज्जनगड फाट्याजवळ खचला. येथील रस्त्याचा भराव वाहून गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परळी खोर्‍यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत.

अनेकदा ठोसेघर मार्गावर दरड कोसळली. गुरूवारी सकाळपासून पावसाचा जोर होता. त्यामुळे डोंगरकपारीतील खाचरे जलमय झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांना जलसमाधी मिळाली.  ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. ठोसेघर मार्गावर  डोंगर दर्‍यातून वाहत येणारे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सायंकाळी ठोसेघर-चाळकेवाडी रस्ता सज्जनगड फाट्याजवळ खचला.

रस्त्याचा भराव पूर्णपणे वाहून गेला असून वाहतूक बंद पडली. रस्त्याचा काही भाग सकाळी कोसळू लागला होता. दिवसभराच्या पावसामुळे सायंकाळी रस्ताच वाहून गेला. यावेळी वाहनधारकांनी तत्काळ वाहने थांबवून या मार्गावर दगडी लावली व वाहतूक बंद केली.

First Published on July 12, 2019 9:02 am

Web Title: satra sajjangad thosghar road landslide due to rain nck 90