News Flash

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आणि समायोजन यासह अन्य मागण्यांसाठी अतिरिक्त शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

शिक्षकांचे अभिनव आंदोलन

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आणि समायोजनाच्या मुद्दय़ाने पुन्हा उचल खाल्ली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिक्षकांनी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा भरवून अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर भरवण्यात आलेली शाळा पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आणि समायोजन यासह अन्य  मागण्यांसाठी अतिरिक्त शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आंदोलकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा भरवली. या वेळी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, इतनी शक्ती हमे तू देना दाता ही प्रार्थना घेऊन परिपाठ घेण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त शिक्षक संतोष आयरे यांनी, विषयतज्ज्ञ संचमान्यता, घटकतज्ज्ञ अतिरिक्त शिक्षक यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनबाबतीत होणारे हाल, रोखलेल्या वेतनामुळे निर्माण होणाऱ्या आíथक अडचणी या मुद्दय़ांवर सविस्तर अध्यापन केले. त्यानंतर बठे व्यायाम प्रकार घेण्यात आले. संजय कुंभार यांनी, कार्यानुभव या विषयात कागदी टोपी तयार करणे हे प्रात्यक्षिक करून घेतले. एस.डी. पाटील यांनी, बोधकथेचे सादरीकरण केले. थोरात  यांनी संतांची शिकवण यावर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी  शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळी यांच्याशी चर्चा केली असता अतिरिक्त शिक्षक समायोजन व वेतन याबाबतचा आदेश तयार झाला असून आयुक्तांची सही होणे बाकी आहे, असे सांगितले. यावर सर्व आंदोलकांनी जोपर्यंत लेखी आदेश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील, असे स्पष्ट केले. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम.डी.पाटील, राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, धनाजी पाटील, शोभाताई पाटील, वंदना कोळी, मारुती कांबळे, मेघा मोरे, भाग्यश्री दराडे आदींनी सहभाग घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 12:52 am

Web Title: school in front of education deputy director
Next Stories
1 ‘शेतकरी हा अर्थकारणाचा कणा’
2 खून मालिका प्रकरणातील संशयिताची निर्दोष मुक्तता
3 शेतकरी कर्जमुक्तीचा फायदा बँका, घोटाळेबाजांनी उठवला
Just Now!
X