26 October 2020

News Flash

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांचे निधन

त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशील व्यक्तीमत्व हरपले अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांचे निधन.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक तसेच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले दादासाहेब बळवंत तथा डी. बी. पाटील यांचे मंगळवारी हृदयविकाराने कोल्हापुरात निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशील व्यक्तीमत्व हरपले अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कोल्हापुरातील शिक्षण क्षेत्रात पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. कोल्हापूरमधील बहुजन समाजाची शिक्षण संस्था असलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्था आज उत्तम पद्धतीने काम करीत आहेत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचेही त्यांनी अनेक वर्षे अध्यक्षपद सांभाळले. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टींना त्यांनी कायमच बळ दिले. कोल्हापूर जिल्हा शैक्षणीक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ आदी संस्थांमध्ये त्यांनी व्यापक स्वरूपात शैक्षणिक उपक्रम राबविले.

डी. बी. पाटील यांचा मुलगा अमेरिकेत असतो. त्याच्याशी चर्चा करून उद्या बुधवारी अंत्यसंस्कारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 8:42 pm

Web Title: senior education expert d b patil passed away in kolhapur aau 85
Next Stories
1 कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय अखेर रद्द
2 सत्तावाटपाची चर्चा वरिष्ठ पातळीवर
3 कोल्हापूरात कामं करुनही खासदार मंडलिकांच्या बंडखोरीमुळे पराभव – चंद्रकांत पाटील
Just Now!
X