कोल्हापूर जिल्हा व शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यमंच्या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र सायबर गुन्हे  पोलीस ठाण्याचे कामकाज येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरु करण्यात आले आहे. ही माहिती या ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. आत्तापर्यंत पोलिसांची ‘सायबर गुन्हे शाखा’ अशी ओळख असणारा विभाग स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे म्हणून काम करण्यास सुरूवात झाली. स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यामुळे नागरिकांची होणारी फरपट थांबण्याची शक्यता आहे.

सायबर गुन्हे विशेष करून हॅकिंग, प्रताधिकार भंग इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्’ांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्’ांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यमंच्या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर गेल्या काही वर्षांंपासून स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. कोल्हापूर  पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून सायबर गुन्ह्यमंचा तपास करण्यात येत होता. मात्र, सायबर गुन्हे दाखल करण्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात जाऊन तRोर द्यवी लागत होती. सायबर पोलीस ठाण्यात सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यमसंदर्भातील तRारी स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस मुख्यालयात प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे.