दयानंद लिपारे

करोना विषाणूच्या संसर्गामुळे आर्थिक उलाढालीची गती कमालीची मंदावली आहे. त्याचा विलक्षण परिणाम सेवाभावी संस्थांवर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी महानगरांतील दानशुरांनी हात आखडता घेतल्याने वंचित, उपेक्षित, दिव्यांग आदींचे शिक्षण, प्रशिक्षण, निवास -भोजन अशा सर्व प्रकारच्या व्यवस्था करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक झळ बसली आहे. देणगीमध्ये लक्षणीय घट झाल्याने आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्याने या संस्थांतील लाभार्थी मोठय़ा संकटात सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. ही मदत गरीब सामान्य लोकांपर्यंत मोठय़ा प्रमाणात पोहोचत आहे. दुसरीकडे, करोना संकटामुळे लहान-मोठय़ा व्यापारी, व्यवसायिक, उद्योजकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.  मुंबई, पुणे, नागपूर आदी महानगरांतील या सधन वर्गासमोर आर्थिक समस्या उभ्या राहिल्याने त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीचा झरा जवळपास आटला आहे. मदत बंद झाल्याने सेवाभावी संस्थांचे सेवाकार्य अडचणीत आले असून त्यांच्याकडील उपेक्षित लाभार्थीचे जीवन कसे व्यतीत करायचे याचा जीवघेणा पेच निर्माण झाला आहे.

महापुरानंतर आता करोना

पोरके गरीब विद्यार्थी असो की निराधार वृद्ध, विविध प्रकारच्या वंचित, निराश्रित घटकांच्या मुखी दोन घास घालण्यासाठी सेवाभावी संस्था चालकांना भलतीच कसरत करावी लागत आहे. कोल्हापूर जिह्यातील नसीमा हुजरूक यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली ‘हेल्पर्स

सेवाकार्य चालवणे कठीण

ऑफ दी हॅण्डिकॅप्ड’ ही एक ही दिव्यांगांना ऊर्जा आणि ऊर्मी देणारी राज्यातील नामवंत सेवाभावी संस्था म्हणून ओळखली जाते. तेही अडचणीत आले आहेत. या वर्षी महापूर आणि करोनाचे संकट उद्भवल्याने आर्थिक मदतीचा ओघ कमी झाला असल्याने

संगोपनाला मर्यादा

सेवाभावी संस्थांसमोर आर्थिक नियोजनाचा अंधार पसरला आहे. सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) यातून या सेवा संस्थांना मोठय़ा प्रमाणात मदत मिळत असते. ही कामे प्रामुख्याने मार्च महिन्यात होत असतात. मात्र यंदा नेमक्या मार्चमध्येच टाळेबंदी सुरू झाल्याने हा फंड उपलब्ध होऊ शकला