‘एव्हीएच’ प्रकल्प राष्ट्रवादी पक्षानेच आणला. तेच तो प्रकल्प हद्दपार करू शकत नाहीत. केवळ लोकांची दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने चालवले आहे. हा प्रकल्प हद्दपार करण्याचे काम शिवसेनाच करेल, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. एव्हीएच प्रकल्प हद्दपार करण्यासाठी पाटणे फाटा रास्ता रोकोनंतर मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख विजय देवणे होते.
दरम्यान, बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बठक मारल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी विजय देवणे, तालुकाप्रमुख संजय पाटील, दिलीप माने, महादेव गावडे यांच्यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका केली. राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार करताना राऊत म्हणाले, एव्हीएच कंपनीने ११ जानेवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला प्रकल्प स्थलांतरित करणार असल्याचे पत्र दिले होते. तर नागपूर येथे २९ जानेवारीला निरीची बैठक घेण्याचे कारण काय, हसन मुश्रीफ आणि नंदिनी बाभूळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प हद्दपार झाल्याचे सांगत केवळ लोकांची दिशाभूल केली आहे. उलट प्रकल्पाच्या उत्पादनात काहीअंशी बदल करून तो चालू करण्याचा प्रस्ताव कंपनीने या बठकीत ठेवला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या नंदिनी बाभूळकर यांनी सही केली आहे. एकीकडे कंपनीला पािठबा द्यायचा आणि दुसरीकडे लोकांची दिशाभूल करीत आंदोलन करायचे, अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत.
या वेळी संग्रामसिंह कुपेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, प्रा. सुनील शिंत्रे यांची भाषणे झाली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, अरिवद नांगनूकर, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, भयासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, आदींसह शिवसनिक उपस्थित होते.