News Flash

मनकर्णिका कुंडावर बांधण्यात आलेले शौचालय शिवसनिकांनी केले उद्ध्वस्त

जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसनिकांना ताब्यात घेतले.

साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेल्या येथील महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावर बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय सोमवारी शिवसनिकांनी उद्ध्वस्त केले. कुदळ, फावडे, पार, घन यांच्या साहाय्याने सुमारे १०० ते १५० जणांच्या जमावाने सार्वजनिक शौचालयाची मोडतोड केली. जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसनिकांना ताब्यात घेतले.

साडेतीन शक्तिपीठांपकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावर शौचालय बांधण्यात आले होते. याबाबत िहदुत्ववादी शिवसनिकांनी वारंवार आवाज उठविला होता. मनकर्णिकेवरील शौचालय हटविण्यासाठी धरणे, मोर्चा यासह विविध मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही याबाबत विधानसभेत आवाज उठविला होता. तसेच ७ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बठकीमध्ये आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मनकर्णिका कुंड हटविण्याबाबत निवेदन दिले होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अमीत सनी यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकारी सनी यांनी एक महिन्यात शौचालय हटविण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने आज संतप्त शिवसनिकांनी मंदिरातील शौचालयावर हल्लाबोल केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी िहदुत्ववादी संघटना शिवाजी चौक येथे एकत्र झाल्या होत्या. प्रथम सर्वानी अंबाबाईचे दर्शन घेतले व मंदिरास एक प्रदक्षिणा काढून घाटी दरवाजानजीक असणाऱ्या बागेतील शौचालयाकडे आपला मोर्चा वळविला. आंदोलकांनी आधीच बागेत आणून ठेवलेल्या पार, हातोडा, कुदळ यांच्या साहाय्याने शौचालयाची मोडतोड करण्यास सुरुवात केली. १०० जणांच्या जमावाने अध्र्या तासात शौचालयातील संरक्षक िभतीसह दोन िभती पाडल्या, तर वॉश बेसिनचाही चक्काचूर केला. या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यासही मारहाण करून पिटाळून लावले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले.

सुरक्षेचे तीन-तेरा

महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेबाबत यंत्रणा किती उदासीन आहे, याचा प्रत्यय आजही आला. आंदोलकांनी मंदिराचे सुरक्षा कवच भेदून कुदळ, पार, हातोडा आत नेले. जुना राजवाडा पोलिसांनी आंदोलकांकडून हे सर्व साहित्य जप्त केले असून आंदोलकांनी हे साहित्य आत कसे नेले याचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 1:53 am

Web Title: shiv sena demolished temple toilet in kolhapur
टॅग : Kolhapur,Shiv Sena
Next Stories
1 ‘प्रगती, उन्नतीच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी आक्रमण’
2 हिंदुत्त्ववादी संघटनांकडून महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न
3 खासगी उद्योगातील आरक्षणावर ठाम – पासवान
Just Now!
X