30 September 2020

News Flash

प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात

आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला होता. यानिमित्ताने दरवर्षी या दिवशी शासनाच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा करण्यात येतो.

प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत अभिवादन करण्यात आले.

‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, ढोल-ताशा-हलगी- तुताऱ्या- लेझीम यांचा गजर, पोवाडय़ांची जोड, शिवकालीन ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके आणि छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी अशा विविध उपक्रमांमधून किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन उत्साहात साजरा झाला. या वेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या उत्सवासाठी गडावर बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला होता.
शिवकाळामध्ये आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला होता. यानिमित्ताने दरवर्षी या दिवशी शासनाच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा करण्यात येतो. या उत्सवात राज्यभरातील शिवप्रेमी जनताही सहभागी होते. या उत्सवाच्या निमित्ताने आज सकाळपासून राज्यभरातून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. भल्या पहाटे सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात या सोहळ्याला सुरवात झाली. सकाळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात व षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, वाईचे उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे , नगराध्यक्षा उज्ज्वला तोश्निवाल, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, अमोल सलागरे आदी आदी उपस्थित होते. तसेच भवानी मातेचे पारंपरिक सेवेकरी विजय हवालदार, नरहरी चिंतामणी हाडप , मनोहर पुराणिक, भवानी माता मंदिर व्यवस्थापक विठ्ठलसिंह परदेशी , नरेंद्रसिंह परदेशी, सीमा परदेशी, विलास मोरे, तसेच प्रतापगड ग्रामस्थ उपस्थित होते.
या नंतर शिवरायांच्या पालखीचे पूजन झाले, तसेच तिची गडावरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ापर्यंत मिरवणूक नेण्यात आली. या वेळी घोषणा, ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. शिवपुतळयास मान्यवरांनी अभिवादन केल्यावर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने मानवंदना दिली. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच यानंतर पोवाडे, ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके, लेझीम आदी खेळ सादर करण्यात आले. या उत्सवास शिव प्रतापदिन उत्सव समितीचे प्रवर्तक मििलद एकबोटे हेही यंदा पोलीस बंदोबस्तात उपस्थित होते. या उत्सवासाठी गडावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 2:35 am

Web Title: shivapratap din celebrated
Next Stories
1 नाम फाउंडेशन एकोपा साधणाऱ्या गावांच्या पाठीशी भक्कमपणे उभी – नाना पाटेकर
2 ऊस उत्पादकांच्या आंदोलनाचे लोण पसरले
3 आंतरजातीय विवाहातून कोल्हापुरात दोघांची हत्या
Just Now!
X