कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी भर पावसात येथे पहिले राज्यव्यापी मूक आंदोलन झाले. या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. जिल्ह्यातील मंत्र्यांनी आंदोलनाचे नेते खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे निमंत्रण दिले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या अंतर्गत कोल्हापूर येथे बुधवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली येथील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक येथे मूक आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह जिल्ह्यातील तिन्ही मंत्री, दोन्ही खासदार, आमदारांनी उपस्थिती लावली होती. श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह शाही परिवार यामध्ये सहभागी होता.  भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भूमिका विशद केली.

Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…
supreme court on ED
‘आरोपींना खटल्याशिवाय डांबून ठेवणं चुकीचं’, सर्वोच्च न्यायालयाची आता ईडीला चपराक

आता राज्यव्यापी आंदोलन

मुख्यमंत्र्यांनी दिलेले चर्चेच्या निमंत्रणाचे स्वागत करत संभाजीराजे म्हणाले, की या बैठकीत मागण्यांबाबत मार्ग निघाला तर त्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक स्वागत करतील. नाशिक येथे होणारे आंदोलन आनंदोत्सव म्हणून साजरा करू. तथापि प्रतिसाद मिळाला नाही तर पुढील पाच ठिकाणचे राज्यव्यापी आंदोलन सुरू राहील. तेव्हा मूक आंदोलन न राहता उत्स्फूर्त आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे -राहुल शेवाळे

मुंबई : मराठा आरक्षणा संदर्भांत लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. तसेच या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्याची मागणी त्यांनी के ली आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांवर आज बैठक

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजे आणि मराठा क्रांती मोर्चाने सुरू के लेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली असून उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सबंधितांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न के ला जाणार आहे.