22 October 2020

News Flash

कोल्हापूरात आढळले सहा नवे करोना पॉझिटिव्ह; सर्वजण मुंबईहून आलेले प्रवासी

यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी एकाच वेळी करोनाचे सहा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे सर्वजण मुंबईहून आलेले इथले स्थानिक नागरिक आहेत. मुंबईहून आलेल्या या प्रवाशांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करोना रुग्णांची स्थिती आत्तापर्यंत नियंत्रणात होती. जे रुग्ण आढळून आले आहेत ते जिल्ह्याबाहेरुन आलेले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोल्हापुरात करोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे.

आज (शनिवार) सहा जणांचा करोना संसर्गाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, हे सर्वजण मुंबई येथून आलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये राधानगरी येथील २३ वर्षांचा तरुण, कागल तालुक्यातील सोनगे येथील ४५ वर्षांची महिला, जयसिंगपूर येथील १८ आणि २० वर्षांचे तरुण, गडहिंग्लज येथील ५७ वर्षाचा आणि भुदरगड येथील एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 11:02 am

Web Title: six new corona positive found in kolhapur all are travelers from mumbai aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 तूर्तास मुंबईहून कोल्हापूरकडे प्रवासी पाठवू नका; सतेज पाटील यांचं पोलीस महासंचालकांना पत्र
2 चित्रीकरणासाठी कोल्हापूरचे निमंत्रण
3 कोल्हापुरातील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अमृतमहोत्सव!
Just Now!
X