चिंचोळ्या रस्त्यावर भरधाव मोटारीने रिक्षा, मोटार, सायकलसह सात दुचाकींना ठोकर दिली. यामध्ये तेरा नागरिक जखमी झाले असून दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
जखमींवर सीपीआरसह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेमध्ये विविध वाहनांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले असून कार परिसरातील वकील चिवटे यांची आहे. बुधवारी रात्री भरधाव वेगाने मोटार बाबू जमाल कडून गंगावेसच्या दिशेने आली. चालकाचा ताबा सुटल्याने कारने धडक दिल्याने दुचाकी व चालक १० फूट फरफटत गेले. एका रिक्षाला मोटारीने धडक दिल्याने रिक्षा सुमारे २० फूट मागे ढकलली. यानंतर मोटारीने तीन गाड्यांना धडक दिली.
चालकाने गाडी वळविण्याचा प्रयत्न केला असता आइस्क्रीम खाण्यासाठी निघालेल्या नाईक कुटुंबीयांना धडक दिली. यानंतर मोटारीने गंगावेस संयुक्त मित्र मंडळाच्या दारातील एका मोटारीस धडक दिली. मोटारीने धडक दिलेल्या दुचाकी, सायकली यांचा अक्षरश: चुराडा झाला होता. जखमींची नावे- नारायण बाळू पाटील (वय २२ रा. तिसंगी ता. गगनबावडा), शशिकांत शंकर पोतदार (वय ४९ रा. कळंबा), भागुबाई दगडू कात्रट (वय ३६ रा. बोंद्रेनगर), सुषमा श्रीकृष्ण जानकर (वय ४४ रा. शुक्रवार पेठ), भाग्यश्री अभिजीत नाईक (वय ३०), अंश अभिजीत नाईक (वय ३) अभिजीत नाईक (वय ३३ सर्व रा. तोरणा नगर सागळमाळ), विनोद वसंत कुरणे (शिवाजी पेठ), कुमार बंडोपत पाटील (रा. निगवे दुमाला ता. करवीर), नारायणी भूषण माने (वय ४), भक्ती भूषण माने, (वय २८), सुवर्णा रमेश भोसले, रमेश दिनकर भोसले