24 February 2019

News Flash

विविध आश्वासनांसह प्रचारदौरा

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ातील भाजपा-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी िशदे यांचा रविवारी झंझावाती प्रचारदौरा झाला.

कोल्हापूर शहरातील सर्व अनतिक उद्योग बंद करणार आहोत, सर्व प्रकारची गुंडगिरी मोडून काढून शहरातील शांतता अबाधित राहण्याची काळजी भाजपाचे सरकार घेईल, असा निर्वाळा गृहराज्यमंत्री राम िशदे यांनी येथे रविवारी बोलताना दिला.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ातील भाजपा-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी िशदे यांचा रविवारी झंझावाती प्रचारदौरा झाला. दिवसभरात त्यांनी तब्बल नऊ ठिकाणी प्रचारसभा घेत शहर िपजून काढले. त्यांनी भाजप आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
कोल्हापूरचा खरा विकास पाहायचा असेल तर त्यासाठी विकासाची दृष्टी असलेले प्रगल्भ नेतृत्व असले पाहिजे. अशी दृष्टी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विकासाची भूमिका पुढे नेण्यास सुरुवात केली आहे. देशात व राज्यात भाजपाला शानदार बहुमत मिळाले आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत असेच भरघोस यश भाजप-ताराराणी आघाडीला निश्चितपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर महापालिकेमध्ये गेली अनेक वष्रे काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. पण त्यांच्याकडून शहराचा विकास झाला नाही, अशी टीका करुन िशदे म्हणाले, विकास कामांच्या नावाखाली पसे मिळविण्याचे प्रकार या महापालिकेत घडत आहेत. भ्रष्टाचाराच्या जंजाळातून महापालिकेला बाहेर काढण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आली असून त्याचा निश्चितपणे लाभ उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

First Published on October 26, 2015 2:00 am

Web Title: state home minister campaign tour