02 March 2021

News Flash

लष्करी कारवाईने कोल्हापुरात जल्लोष

हिंदुत्ववादी कार्यकत्रे, संघटना यांनी फटाके फोडून जल्लोष करतानाच मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करून अतिरेक्यांचा खात्मा केल्याने या कृतीचे कोल्हापूर शहर व जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

हिंदुत्ववादी कार्यकत्रे, संघटना यांनी फटाके फोडून जल्लोष करतानाच मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.  मिरवणूक काढून भारतीय सन्य व प्रधानमंत्री मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या . मुस्लीम बोìडगच्यावतीने पाकिस्तानावरील या कारवाईचे स्वागत करण्यात आले.

भारताची कळ काढणाऱ्या पाकिस्तानला आज भारतीय सन्याने लष्करी कारवाईच्या या माध्यमातून जशास तसे उत्तर दिले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कार्यकत्रे दुचाकी वरून घोषणा देत फिरू लागले. भारतीय सन्याचा जयघोष केला जात असतानाच पाकिस्तानच्या नावाने खडे फोडले जात होते .  बजरंग दलाचे कार्यकत्रे शिवाजी चौकात जमले. येथे मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात आले. महागाई कितीही होऊ दे, पण पापी पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून मिटवून टाका, असे म्हणत सरकार व लष्कराला पाठिंबा देण्यात आला. नागरिकांना जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला गेला.  याच ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे जल्लोष केला . कार्यकर्त्यांनी जलादो ..जलादो .. पाकिस्तान जलादो, देश का नेता कैसा हो..नरेंद्र मोदी जैसा हो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. प्रभावती इनामदार,  मधुमती पावनगडकर, सूर्यवंशी, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी, नचिकेत भुर्के, अक्षय मोरे, सुजय मेंगाणे, राजू मोरे,आदी कार्यकत्रे उपस्थित होते.

मुस्लीम बोìडगच्यावतीने भारतीय जवान, भारत सरकार व मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. इट का जवाब पत्थरसे या उक्तीचा अनुभव देऊन पाकिस्तानची जिरवल्याचा आनंद बोìडगचे प्रशासक कादर  मलबारी, पापभाई बागवान, लियाकत मुजावर, गणी आजरेकर आदींनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 2:27 am

Web Title: surgical strike celebration in kolhapur
Next Stories
1 ‘प्राधिकरण प्रस्ताव विकासाचा सुवर्णमध्य’
2 आधी दणदणाट मग दिलगिरी!
3 शेतकरी बाजार कार्यक्रम पत्रिकेवरून वाद
Just Now!
X