गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र  दुष्काळग्रस्त आहे.  डोक्यावर कर्ज असूनही शेतकरी पीक घेऊन राष्ट्रीय उत्पन्न वाढवत आहे. याचा सरकारला विसर पडला आहे. ज्या देशात ३५ हजार कोटीपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या उद्योगपतींना कर्ज माफ केले जाते, तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची भूमिका योग्यच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ लेखिका अनुराधा गुरव यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आलेल्या िशदे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पाच राज्यातील निकालाबाबत ते म्हणाले, सत्तेवर येण्यासाठी आघाडी सरकारने पशाच्या जोरावर निवडणुका लढवल्या. यामुळेच गोवा-मणिपूरमध्ये भाजपला बहुमत मिळाले. मायावतींनी ई.व्ही.एम. मशिनमधील गोंधळाबाबत तक्रार केली आहे. आघाडी पक्षाचा हा विजय पाहता ईव्हीएम मशिन तपासून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या पराभवाबाबत ते म्हणाले, अशा परिस्थितीला काँग्रस कायमच सामोरी गेली आहे. १९७१, १९७९, १९८९ अशा तीनही वेळेला नेतृत्व बदलाची मागणी झाली होती. पक्ष संघटनेत काम करताना चढ-उतार येतच असतात. हे चढ-उतार काँग्रेसने अनुभवले आहेत. त्यामुळे आताही काँग्रेस डगमगली नाही. दोन महिन्यांपूर्वीच देशपातळीवरील ज्येष्ठ नेत्यांची कार्यकारी समितीची बठक होऊन  एक ठराव करण्यात आला आहे. या ठरावानुसार राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व नेते होतील असा प्रस्ताव केला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल. ते पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या समविचारी पक्षांशी युती करतील. शिवसेनेबराबेर ते नक्कीच असणार नाहीत. अजूनही काँग्रेसला साथ देणारे कार्यकत्रे आहेत. त्यामुळे इथून पुढेही काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत डगमगणार नाही.

सनिकांवरील हल्ल्यांबाबत ते म्हणाले, छत्तीसगड येथे सनिकांवर हल्ला झाला. त्यात सनिक मारले गेले, पण रक्ताचे पाट वाहात असताना निवडणुकीतील आपला विजय गुलालासहित साजरा करण्यातच भाजप सरकारला भूषण वाटले. या बलिदानाप्रीत्यर्थ विजयोत्सवाची तारीख पुढे ढकलावी असे देखील त्यांना वाटले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.