29 September 2020

News Flash

वस्त्रोद्योग एक दिवस बंद ठेवणार

वस्त्रोद्योगात आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस २४ तास यंत्रमाग कारखाने बंद ठेवणे

मंदीवर मात करण्यासाठी उपाययोजना
वस्त्रोद्योगात आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस २४ तास यंत्रमाग कारखाने बंद ठेवणे, सर्व कापडांच्या विक्रीची देयके मिळण्याचा कालावधी एकच ठेवणे, कापडाला ताग्यावर आधारित दलाली ठरविणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय इचलकरंजी येथे झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घेण्यात आले. अध्यक्षस्थानी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन होते.
वस्त्रोद्योगात सध्या असलेल्या मंदीच्या पाश्र्वभूमीवर येथील यंत्रमागधारक जागृती संघटनेच्यावतीने इचलकरंजी शहरातील विविध भागात यंत्रमागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार एकत्रित निर्णय घेण्यासाठी यंत्रमागधारकांचा मेळावा झाला.
वस्त्रोद्योगातील मंदीवर मात करण्यासाठी आजी-माजी आमदार व खासदार यांनी पुढे यावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. सभेत सूरज दुबे, भानुदास वीर, अशोक बुगड, महेश दुधाणे, सचिन मांगलेकर, बजरंग जाधव, रघुनाथ जमादार आदींची भाषणे झाली. यंत्रमाग व्यवसायाला सॅनव्हॅट कर लागू करावा, कापसाचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश करावा, तसेच सुतावर दर छापावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी लढा देण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला.

‘वस्त्रोद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
वस्त्रोद्योगमंत्री व जिल्ह्यचे पालकमंत्री अशी जबाबदार खाती झेपत नसताना घेऊन फिरणारे चंद्रकांत पाटील यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राला दोन वर्षांत एकदाही भेट दिली नाही. त्यांनी वस्त्रोद्योग व्यवसायाचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत की कसली सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. या पदासाठी पात्रता असणाऱ्या व्यक्तीस जागा करून द्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष महाजन यांनी सभेत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:16 am

Web Title: textiles industry will close for a day says vinay mahajan
Next Stories
1 शिरोली औद्योगिक वसाहतीसाठी सर्वतोपरी मदत करू -ए.डी. चव्हाण
2 ‘पोलंडचे कोल्हापूरशी शैक्षणिक बंध दृढ व्हावेत’
3 ‘ब्रँड निश्चितीमुळे शेतीमालाला दर मिळेल’
Just Now!
X