कोल्हापूर : अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारी चांगलाच दणका बसला. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसूल केल्याबद्दल डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांचे निलंबनाचे आदेश काढले.

नारायण पांडुरंग गावडे आणि महादेव पी. रेपे अशी दोघांची नावे आहेत, तर राजवाडा पोलीस ठाण्यात विवाहितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अमित सुळगावकर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. अवैध व्यावसायिकांशी संबंध ठेवणाऱ्या जिल्ह्यातील पन्नासहून अधिक पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मटका अड्डे, क्रिकेट बेटिंग, अवैध मद्यविक्रि, मद्यतस्करी रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले होते. संशयितांवर कडक कारवाई करणे अपेक्षित असताना काही पोलिसांनी अवैध व्यावसायिकांनाच संरक्षण दिले. गावडे व रेपे या दोघांनी क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या बुकींशी संपर्क साधून सावध राहण्याचा सल्ला देत हप्ते वसुली केली. देशमुख यांनी तातडीने गावडे व रेपे या दोघांची मुख्यालयात बदली केली होती, तर आज निलंबनाच्या कारवाईचे आदेश जारी केले. पतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे आमिष दाखवून आणि अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तीन खासगी सावकारांनी विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले होते