05 July 2020

News Flash

चोरी करणाऱ्या तीन महिलांना पकडले

पुढील तपासासाठी या तिघींना येथील राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

कोल्हापूर : संशयावरुन ताब्यात घेतलेल्या तीन महिलांकडून दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोऱ्या उघडकीस आणण्यात इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले आहे. त्यांच्याकडून ३०  ग्रॅम वजनाचे सोन्याचे ७५ हजार रुपये किमतीचे गंठण हस्तगत करण्यात आले.

राणी विजय कांबळे (वय ३० ,  रा. संभाजीनगर जयसिंगपूर), मीना मारुती पाटोळे (वय ४० ,  रा. बुधगांव ता. मिरज) व ज्योती नामदेव सकट (वय ६० ,  रा. जयसिंगपूर )अशी या संशयित  महिलांची नांवे आहेत.

इचलकरंजी शहर व परिसरातील चोऱ्या, घरफोडय़ा  अशा विविध गुन्ह्य़ांचा  स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असताना कोल्हापूर-जयसिंगपूर रोडवरील हॉटेल ऐसपैस परिसरात खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचण्यात आला होता. यामध्ये  वरील  तिघींना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत व तपासणीत सोन्याचे गंठण आढळून आले. त्या संदर्भात चौकशी करता दीड महिन्यापूर्वी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथून ते चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पुढील तपासासाठी या तिघींना येथील राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2018 2:46 am

Web Title: three women were arrested in robbery case
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना पराभूत करण्याचा ‘स्वाभिमानी’च्या बंडखोरांचा इशारा
2 निवडणूक न लढण्यावरून चंद्रकांतदादांचे घूमजाव
3 ‘आणीबाणीतील कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा द्या’
Just Now!
X