X

चोरी करणाऱ्या तीन महिलांना पकडले

पुढील तपासासाठी या तिघींना येथील राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

कोल्हापूर : संशयावरुन ताब्यात घेतलेल्या तीन महिलांकडून दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोऱ्या उघडकीस आणण्यात इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले आहे. त्यांच्याकडून ३०  ग्रॅम वजनाचे सोन्याचे ७५ हजार रुपये किमतीचे गंठण हस्तगत करण्यात आले.

राणी विजय कांबळे (वय ३० ,  रा. संभाजीनगर जयसिंगपूर), मीना मारुती पाटोळे (वय ४० ,  रा. बुधगांव ता. मिरज) व ज्योती नामदेव सकट (वय ६० ,  रा. जयसिंगपूर )अशी या संशयित  महिलांची नांवे आहेत.

इचलकरंजी शहर व परिसरातील चोऱ्या, घरफोडय़ा  अशा विविध गुन्ह्य़ांचा  स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु असताना कोल्हापूर-जयसिंगपूर रोडवरील हॉटेल ऐसपैस परिसरात खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरुन सापळा रचण्यात आला होता. यामध्ये  वरील  तिघींना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत व तपासणीत सोन्याचे गंठण आढळून आले. त्या संदर्भात चौकशी करता दीड महिन्यापूर्वी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथून ते चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पुढील तपासासाठी या तिघींना येथील राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Outbrain

Show comments