22 January 2018

News Flash

इचलकरंजीमध्ये क्रेन अंगावर पडून तीन कामगारांचा मृत्यू

सांगवडे गावातील घटना

कोल्हापूर | Updated: May 19, 2017 4:48 PM

पाचव्या मजल्यावरून पडून पिंपरीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

इचलकरंजीतील सांगवडे गावात विहिरीचे खोदकाम सुरु असताना झालेल्या अपघातात  तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवडे गावात विहिरीचे खोदकाम काम सुरु असताना शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. या दुर्घटनेत बाबुराव वडार (वय ५४), रामचंद्र साळवी (वय ४५), भैय्यालाल माळी (वय ३५) या कामगारांचा मृत्यू झाला. तर शिवाजी पवार हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. क्रेनचा रोप तुटल्याने हा अपघात झाला. ट्रॅाली भरलेला क्रेन वर जात असताना अचानक क्रेनच्या दोर तुटला आणि विहिरीत काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर कोसळला.

First Published on May 19, 2017 12:36 pm

Web Title: three workers death due to crane fall on body ichalkaranji kolhapur
  1. No Comments.