News Flash

दत्त साखर कारखान्यामध्ये तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना कामगार कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई

प्राथमिक छायाचित्र

दयानंद लिपारे

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्या मध्ये तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. गोपाळ जंगम (रा. औरवाड) संदीप कांबळे (राहणार कुटवाड) राजेश ठुमके (रा. उदगाव) अशी मृत कामगारांची नावे आहेत.

दत्त साखर कारखान्यातील पाणी शुद्धीकरणाच्या टाकीच्या सफाईचे काम आज सुरु होते. यासाठी गोपाळ जंगम हे खाली उतरले होते. श्वास पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा बचावण्यासाठी इतर दोघे खाली उतरले. पण त्यांचाही यामुळेच मृत्यू झाला. चौथा कामगार सुखरूपपणे वर आला. त्याने इतर कामगारांना याची माहिती दिली. घटनास्थळी शिरोळ पोलिस दाखल झाले.

वारसांना नोकरी

दरम्यान मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना कामगार कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शिवाय तिघांच्या कुटुंबातील एकाला कारखान्याच्या सेवेत सामावून घेतले जाणार आहे, असे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 1:17 am

Web Title: three workers suffocate in datta sugar factory abn 97
Next Stories
1 भाविकांविना जोतिबा यात्रेस प्रारंभ
2 गोकुळच्या प्रचारात जुनेच मुद्दे
3 करोना निर्बंधात ‘गोकुळ’च्या सभांची गर्दी कशी चालते
Just Now!
X