News Flash

कोल्हापूर सराफ संघटनेचा उद्या सराफ बाजार बंद

केंद्र सरकारच्या जाचक नियमांना विरोध

सोन्याबरोबच चांदीच्या दरांमध्येही वर्षभरात जवळपास १० टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली.

दोन लाख रुपयांच्या सोने-चांदी खरेदीसाठी केंद्र सरकारने पॅन कार्डची सक्ती केली आहे. या आणि इतर जाचक नियमांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेतर्फे बुधवारी (१० फेबुवारी) सराफ बाजार बंद केला जाणार असल्याची, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सोमवारी येथे दिली.
गायकवाड ,ओसवाल यांनी सांगितले की, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनची मुंबईत बठक होऊन त्यामध्ये दोन लाखांच्या खरेदीवरील पॅन कार्ड सक्ती,फॉर्म नंबर ६० व ६१ भरून घेणे व सहा वष्रे असे रेकॉर्ड सांभाळावे, अशा जाचक निर्णयाच्या विरोधात सराफ सुवर्णकार संघटनेचा शांततेच्या मार्गाने विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यानुसार पहिल्या टप्प्यात गेल्या महिन्यात देशभर कँडल मार्चचे आयोजन केले होते. येथेही शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. यासंबंधीचे निवेदनही खासदार धनंजय महाडिक यांना देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनानुसार जिल्ह्यातील संपूर्ण सराफ व्यवसायायिक आपली दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2016 3:15 am

Web Title: tomorrow saraf market closed of kolhapur saraf association
Next Stories
1 न्यायव्यवस्थेसमोर विश्वास वृद्धिंगत करण्याचे आव्हान -मुख्यमंत्री
2 अतिरिक्त टोल वसुलीतील ९० टक्के रक्कम विकासासाठी वापरणार
3 धमकी, सावकारकीबद्दल इचलकरंजीत दोघांना अटक
Just Now!
X