21 September 2018

News Flash

‘त्रिपुरारी’च्या दीपोत्सवाने पंचगंगेचा घाट उजळला

यंदाही असेच विहंगम दृश्यं पंचगंगा काठी पाहायला मिळाले.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीवर हजारो पणत्या प्रज्वलित झाल्याने असे  नयनरम्य दृश्य नजरेला पडत होते.

पहाटेचे उल्हसित करणारे वातावरण आणि बोचऱ्या थंडीची हुडहुडी भरली असतानाही शनिवारची पहाट मात्र करवीरकरांच्या मनात चतन्याची ज्योत प्रज्वलित करत राहिली. याला कारण ठरले ते दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेचे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला.

HOT DEALS
  • ARYA Z4 SSP5, 8 GB (Gold)
    ₹ 3799 MRP ₹ 5699 -33%
    ₹380 Cashback
  • Moto Z2 Play 64 GB Lunar Grey
    ₹ 14999 MRP ₹ 29499 -49%
    ₹2300 Cashback

बोचरी थंडी असतानाही मिणमिणत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा घाटावर मोठी आज भल्या पहाटे  गर्दी केली होती. कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीवर हजारो पणत्या प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला जातो. यंदाही असेच विहंगम दृश्यं पंचगंगा काठी पाहायला मिळाले.

नदीवरील सर्व घाट, ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, रावणेश्वर, कुणकेश्वर मंदिर, पिकनिक पॉइंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकण्यात आले होते. आरती केल्यानंतर भव्य आतषबाजी झाली. सामाजिक आशयाच्या रांगोळ्या

दीपोत्सवाबरोबरच पंचगंगाकाठी रांगोळीचे जणू प्रदर्शन भरलेले असते. कलानगरीच्या कलाकाराची अदा येथे प्रवाहित झाल्याचे नयनरम्य दृश्य नजरेला पडते. येथे अनेक प्रबोधनात्मक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारित ‘नका घेऊ फाशी, जग राहील उपाशी’ असा संदेश देणारी, सेल्फीच्या हव्यासावर आधारित ‘माणसाने आपली माणुसकी दाखविण्याचा कहर’. कोल्हापूरकरांच्या जीव रंगलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नायक राणादा याची गणेशाबरोबर कुस्ती या लक्षवेधी ठरल्या. तर,   पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘विष्णू आणि लक्ष्मी प्रकट’ झाल्याचा देखावा डोळ्यात अंजन घालणारा होता.

First Published on November 5, 2017 1:01 am

Web Title: tripurari purnima 2017 kolhapur