येथील डॉ . पत्की हॉस्पिटल व डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज यांच्या जुळ्या मुलांच्या हस्तठशांवरील संशोधनास राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. येथील  स्त्री रोग आणि प्रसूतिशास्त्र क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित असलेल्या पत्की हॉस्पिटल रिसर्च फौंडेशन आणि डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज शरीरशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या जुळ्या मुलांचा तुलनात्मक हस्तठसे म्हणजेच िफगरिपट्र्स यावरील संशोधनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०१४  साली या संशोधनास सुरुवात झाली.पण गेल्या २ वर्षांत सातत्याने केलेले हे संशोधन ‘नॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल अ‍ॅनॉटॉमी’ या नियतकालिकामधून एप्रिल २०१७ मध्ये प्रसिद्ध होणार आहे.अशा  संशोधनास मान्यता मिळणे ही देशातील पहिलीच घटना असल्याचे डॉ.सतीश पत्की यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पत्की हॉस्पिटल आणि डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, शरीर शास्त्र विभागमधील डॉ. अनिता गुणे, डॉ.आनंद पोटे यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले, असेही डॉ.पत्की म्हणाले.

इथे जन्मतात जुळी

डॉ . पत्की हॉस्पिटल म्हणजे जुळी जन्मण्याचे केंद्रच बनले आहे. याचा प्रत्यय रविवारी आला.  हुबेहूब दिसणारी  अनेक जुळी मुले आज या कार्यक्रमास  हजर होती. त्यांच्या पालकवर्गाने  डॉ.पत्की दाम्पत्याचे अभिनंदन केले. आतापर्यंत जवळजवळ ५७३ जुळी आणि ८ तिळी यांचा जन्म त्यांच्या हॉस्पिटल मध्ये झाला आहे. जुळ्यामधेही हुबेहूब म्हणजे आयडेंटिकल जुळी यांचे प्रमाण ३५ टक्के असते, असे डॉ.पत्की यांनी सांगितले.

काय आहे संशोधन

एकाच हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या हुबेहूब म्हणजेच आयडेंटिकल जुळी मुलांच्या हस्तठशांवरील संशोधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाली. हे पहिले संशोधन  आहे. यांच्यात जरी जनुकीय साम्य असले तरी त्यांच्या ठशांमध्ये फक्त ४५ टक्के साम्य असते.बायोमेट्रिक प्रणालीत व्यक्ती ओळख करण्यात फसगत होणार नाही असा निष्कर्ष या संशोधनावरून निघतो. हे संशोधन संपूर्ण वैद्यकीय शास्त्रावर आधारित आहे. अशा  व्यक्तींचे ठसे घेताना फक्त अंगठा किंवा एका बोटाचे ठसे घेऊन चालणार नसून आधार कार्डप्रमाणे तळहाताचे ठसे घेणे आवश्यक आहे, असेही यात आढळून आले. दोन्ही जुळ्यांपकी कमी वजनाच्या मुलांमध्ये हस्त रेषा जास्त असतात हेही निदर्शनास आले आहे. यामुळे बायोमेट्रिक आणि सरकारी धोरण यांच्यासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वाचे ठरू शकते.