कोल्हापूर : परंपरेच्या वादातून भावाचा खून केल्याप्रकरणी दोघा भावांना गुरुवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महादेव पुजारी व अशोक पुजारी अशी आरोपींची नावे आहेत. अण्णासाहेब  पुजारी या व्यक्तीचा खून झाला होता.

अण्णासाहेब आणि आरोपी बंधू महादेव व अशोक हे तिघे एकाच भावकीतील. वाशी (ता. करवीर) या त्यांच्या गावातील बिरदेव मंदिरात ११ मार्च २०१८ रोजी जेवणाचा कार्यक्रम होता. परंपरेनुसार भावकीतील लोकांना भांडी घासावी लागतात. अण्णासाहेब हे काम करण्यासाठी जात असताना त्याला अशोक व  महादेव यांनी विरोध करीत  मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी अकरा साक्षीदार तपासले. या प्रकरणी सत्र न्यायाधीश डी. के. गुडधे यांनी दोघा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली