13 December 2017

News Flash

उदमांजराच्या दुर्मीळ प्रजातींची पिले पन्हाळय़ावर आढळली

पन्हाळय़ावरील रेडे घाट येथील वनविभाग परिसरात उदमांजराच्या दुर्मीळ प्रजातींची दोन पिले आढळली.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: October 8, 2017 3:19 AM

पन्हाळय़ावरील रेडे घाट येथील वनविभाग परिसरात उदमांजराच्या दुर्मीळ प्रजातींची दोन पिले आढळली.

पन्हाळय़ावरील रेडे घाट येथील वनविभाग परिसरात उदमांजराच्या दुर्मीळ प्रजातींची दोन पिले आढळली. या परिसरातच या पिलांची माता मृतावस्थेत आढळली होती. या दोन्हीही पिलांना ताब्यात घेऊन तबक उद्यान येथे ठेवले आहे. मात्र या पिलांचे पुढे काय करायचे, याची दिशा अद्याप अस्पष्ट आहे.

पन्हाळा ते पावनगड या परिसरात अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आढळते. यापूर्वी रानमांजर, भेकर, ससा, मुंगुस या बरोबरच रानडुक्कर आणि बिबटय़ा वाघ यांचे दर्शन या परिसरात झाले आहे. पण पन्हाळ्याच्या या परिसरात वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अनोळखी व्यक्तींकडून आग लावण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने येथील वनसंपत्ती कमी झाली. परिणामी येथे वावर असणाऱ्या वन्यप्राण्यांनी आपला मुक्कम येथून हलविला.

मात्र अलीकडे भारतीय दुर्मीळ प्रजातीचे उदमांजर व त्याची पिले यांचे अनेक दिवसांपासून येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिक पावनगड व पन्हाळा येथील लोकांना दर्शन होत होते. या जंगलातील रानमेवाच कमी झाल्याने या उदमांजरांना आपली भूक भागविण्यासाठी मानवी वस्तीत यावे लागत आहे. दोन दिवासांपूर्वी पन्हाळा वनविभगाच्या वृक्षसंग्रालयाच्या रेडे घाट परिसरात मृतावस्थेत दुर्मीळ उदमांजर आढळून आले.

या मांजराची जाणीवपूर्वक शिकार केली की कोणत्या वाहनाने ठोकरले, या प्रश्नांचे उत्तर मात्र अद्याप अनुत्तरित  आहे. या उदमांजराच्या मृत्यूमुळे पिले भयभीत झाली होती. अनूप गवंडी हे या परिसरात फिरायला गेले असता त्यांना या मांजराची दोन पिले आढळून आल्याने त्यांनी याची माहिती वनविभागाला कळविली. त्यानंतर कर्तव्याचे पालन करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आले. या दोन्हीही पिलांना ताब्यात घेऊन तबक उद्यान येथे ठेवले आहे. मात्र या पिलांचे पुढे काय करायचे, याची दिशा अद्याप अस्पष्ट आहे. वनविभागाने प्राण्याची गणना केली नसल्याने आपल्या परिक्षेत्रात कोणकोणते प्राणी आहेत, याची वनविभागाला कल्पनाच नाही हे यावरून समोर आले आहे.

First Published on October 8, 2017 3:19 am

Web Title: two rare species piglets of asian palm civet found in panhala
टॅग Asian Palm Civet