18 March 2018

News Flash

शरद पवार – मुख्यमंत्री भेटीवर उद्धव यांची टीका

शेतकरी अडचणीत असताना क्रिकेटवर चर्चा केल्याचा आरोप

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: November 25, 2017 1:23 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

शेतकरी अडचणीत असताना क्रिकेटवर चर्चा केल्याचा आरोप

राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाठीभेटी घेत आहेत. या बठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी मुंबई क्रिकेट मंडळाचे भले कसे होईल याचा विचार केला जात आहे. अशांना ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ कसे म्हणावे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

ठाकरे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. नेसरी येथील सभेत ठाकरे यांनी शासनाच्या शेतकरी धोरणांवर फटकारे ओढले. ठाकरे म्हणाले, की सध्या शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सौभाग्य योजना आणली. एकही पसे न घेता वीज पुरवठा करणार होते. पण, एकीकडे वीज द्यायची आणि दुसरीकडे ती कापायची असा प्रकार सुरू आहे. राज्यातील शेतकरी त्रासला आहे, तरीही तो सोने पिकवतो. तो या मातीचा राजा आहे. त्याला तुमचे उपकार नकोत तर शेतमालाला हमीभाव पाहिजे. पण हे सरकार त्याला त्याच्या घामाचे मोल देत नसल्याची टीका त्यांनी केली.

कोल्हापूरचे एक ‘पार्सल’ मंत्रिमंडळात आहे, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांनी खिल्ली उडवली. ‘निम्मे डांबर वापरून रस्ते करा’, ‘रस्त्यावर खड्डे पडले तर आभाळ कोसळत नाही’ असे म्हणणारे ते कोण आहेत, अशी विचारणा त्यांनी केल्यावर शिवसनिकांनी ‘चंदूमामा’ असा गलका केला. त्यावर ठाकरे यांनी ‘त्यांनी तुम्हाला मामा बनवले आहे’, असे म्हणत मंत्री पाटील यांच्यावर शेरेबाजी केली. पाटलांच्या मंत्रिपदाचा कसलाच उपयोग या जिल्ह्य़ाला झाला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकरी तुरुंगात अन् मल्ल्याची चैन

कृषी कर्जमाफी अर्जात अनवधानाने चूक केली तर शेतकरी तुरुंगात जाणार आहे. पण मल्ल्यासारखे कोटय़वधीचे कर्जचुकवे गर्भश्रीमंत विदेशात मजा मारत आहेत. एक तर शेतकऱ्याला गावामध्ये धड शिकू देत नाही आणि चूक झाली की तुरुंगवारी करायला लावताय. हे असले सरकार आपले असू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात सत्ता आल्यावर बेळगावही महाराष्ट्रात आणण्यात येईल असेही ते या वेळी म्हणाले.

First Published on November 25, 2017 1:23 am

Web Title: uddhav thackeray comment on sharad pawar and devendra fadnavis
 1. V
  vasant
  Nov 29, 2017 at 7:31 am
  जसा उंदीर दात आले कि प्रत्येक गोष्ट कुर्तडतो तसे ह्या शिवसेनेचे झाले आहे . त्यांना निवडणुकीत दात आले पण खायला काही नाही मग कुर्तडतायत बाकी काय अगोदरच पप्पू त्यातून टाकला दोन्ही pappuna वारसाने सत्ता मिळाली पण लायकी नाही मग असे होते त्यांच्या आजूबाजूचे टिनपाट पुढारी घालतात भरीला आणि मग या पप्पूनचे होत कल्याण
  Reply
  1. V
   Vijay S
   Nov 25, 2017 at 12:05 pm
   गुजरातमधे भाजप विरोधी प्रचाराला न जाता पवार फडणवीस भेटीची काय चिंता करताय राव ? आता मोठी ऊडी घ्या. राहूल ममता लालू हार्दीक केजरी सोबत जायचे आहेच तर आता घरात बसून कसे चालेल. शिवाय केवळ महाराष्ट्र नव्हे तर अख्या भारतातील शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार हवा.
   Reply
   1. H
    Hemant Purushottam
    Nov 25, 2017 at 12:03 pm
    राजकारणाच्या खाचाखोचा वेगळ्याच असतात. नारायण राणे यांच्या उमेदवारी संदर्भात बोलणी करणार आहोत असे ना फडणवीस सांगु शकतात ना पवार! मग क्रिकेटचा आडोसा घेतला जातो. पवारांना भेटायला फडणवीस जातात आणि ा भेटायला चंद्रकांत दादा हा मुद्दा काहीअंशी status शी जोडल्या जातो. अशावेळी 'शेतकरी' व 'शेतकारीहीत' असे मुद्दे फार उपयोगाचे ठरतात.
    Reply
    1. Y
     yogesh ambhaikar
     Nov 25, 2017 at 8:36 am
     नारद मुनीला भेटू नका. भांडण लागतील. घर फुटले. सत्ता फुटलं.
     Reply
     1. J
      jayant
      Nov 25, 2017 at 7:23 am
      बहुतेक सगळी माध्यमे मारवाद्यांच्या हातात आहेत . ते खोट्या बातम्या पसरवून भा ज प ला बदनाम करायला बघताहेत.त्यांना करप्शन काही केल्या मिळत नाही तेंव्हा हिंदू मुस्लिम वगैरे सांगून लोकांना भडकवतात
      Reply
      1. S
       sanjay
       Nov 25, 2017 at 6:36 am
       शेलक्या शब्दात विरोधकांचा पाणउतारा करण्यासाठी फार अक्कल वगैरेचा वापर करावा लागत नाही.
       Reply
       1. Load More Comments