08 July 2020

News Flash

पावसाळ्यात कोल्हापुरात पाणीटंचाई

दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

 

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका

दुष्काळाच्या झळा संपून पावसाने दमदार सलामी दिली असतानाही कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे  ऐन पावसाळ्यात  नागरिकांना सोमवारपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत  आहे.  दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. बािलगा जलशुद्धिकरण केंद्र ते चंबुखडी या दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने शहराच्या बहुतांश भागांत सोमवारपासून दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.  पाणीटंचाई असलेल्या  भागात महापालिकेच्या आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागवण्याचा अल्पसा प्रयत्न केला जात आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या िशगणापूर बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठा बंद झाल्याने मे महिन्याच्या अखेरीस नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. आता पावसाला चांगली सुरवात झाली आहे. नद्या , नाले , धरण येथे पाण्याची पातळी वाढली आहे. पाणी आहे पण ते पुरवता येत नाही , अशी अवस्था बनली असल्याने ऐन पावसाळ्यात  नागरिकांना सोमवारपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

बािलगा येथून भोगावती नदीतील पाणी उपसा करून ते गावातील जलशुद्धिकरण केंद्रात सोडण्यात येते. तेथून शुद्धिकरण करून िशगणापूर, चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते. तेथून या पाण्याचे वितरण शहराच्या ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डातील काही भागांत केले जाते. बािलगा ते िशगणापूर या मार्गावारील सुमारे ७५० मि.मी. व्यासाच्या दाबनलिकेवरील गळती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसर, रंकाळा परिसर, फलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, तसेच सी व डी वॉर्डामधील संपूर्ण भाग, शिवाजी उद्यमनगर परिसर इत्यादी भागांत आज व मंगळवारी असे दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही.  यातील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 1:52 am

Web Title: water shortage in monsoon in kolhapur
टॅग Kolhapur,Monsoon
Next Stories
1 भोगावतीतील संचालकांवर कारवाईची टांगती तलवार
2 युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे करवीरनगरीत स्वागत
3 ऐतिहासिक मोती तलाव बुजविण्याचे काम सुरू
Just Now!
X