सायिझग कामगारांना ५०० रुपयांची पगारवाढ देण्याचा पर्याय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी सायिझगधारक व कामगार प्रतिनिधी यांना सूचविला. पण उभय घटकांनी त्यावर बठक घेऊन संमती कळवितो, असे सांगितल्याने शनिवारी रात्री झालेल्या बठकीत ठोस निर्णय झाला नाही
सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी गत ४७ दिवसांपासून सुरू असलेल्या सायिझग-वाìपग कामगारांच्या संपाबाबत तोडगा काढून वस्त्रनगरीतील खडखडाट पूर्ववत सुरू व्हावा यासाठी येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये प्रशासनाच्या वतीने बठक आयोजित केली होती. या बठकीस खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अशोकराव जांभळे, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बिरंजे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, कामगार आयुक्त आर. आर. हेंद्रे यांच्यासह सायिझगधारक कृती समितीचे बाळ महाराज, प्रकाश गौड, दिलीप ढोकळे, सतीश कोष्टी, विनय महाजन, सचिन हुक्किरे, दीपक राशिनकर, विश्वनाथ मेटे, िहदुराव शेळके यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी बठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर कामगार नेते ए. बी. पाटील आणि सायिझगधारक कृती समितीचे बाळ महाराज यांनी आपापली भूमिका मांडताना पूर्वीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
सुमारे दोन तासानंतर जिल्हाधिकारी सनी यांनी ५०० रुपयांची पगारवाढ स्वीकारण्याचा पर्याय मांडला. त्यावर ए. बी. पाटील यांनी सहकार्यासमवेत चर्चा केली. त्यांनी ५०० रुपये पगारवाढ परवडण्याजोगी नसल्याने त्यामध्ये वाढ केली जावी अशी आग्रही भूमिका घेतली. तर बाळ महाराज, प्रकाश गौड यांनी संप मागे घ्यावा व क्लेम नोटीसा मागे घेतल्या गेल्यास पर्यायाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. चच्रेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. अखेर सनी यांनी ५०० रुपये पगार वाढ घेऊन कामगारांनी कामावर जावे व सायिझगधारकांनी उद्योग सुरू करावा, असा निर्णय जाहीर करून बठक संपल्याचे जाहीर केले. पाठोपाठ सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी सभागृहातून निघून गेले.
यानंतर बाळ महाराज व ए. बी. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका विषद केली. बाळ महाराज म्हणाले, सुधारित किमान वेतनाबाबत न्यायालयाचा निर्णय सोमवार-मंगळवापर्यंत अपेक्षित आहे. या निर्णयानंतर बुधवारी सायिझगधारकांची बठक होऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. कामगार संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणाही केली नसल्याने सायिझग सुरू करण्याचा मुद्दा उद्भवत नाही.
दरम्यान, ए. बी. पाटील यांनी, आपली भूमिका नकारात्मक नसल्याचे सांगत सायिझगधारकांकडे बोट दाखविले. ते म्हणाले, रविवारी कामगारांचा मेळावा होणार असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून जे सायिझगधारक ११०० रुपयापर्यंत वाढ देतील ती स्वीकारून कामगारांनी कामावर रुजू होण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. सायिझगधारक बुधवापर्यंत बोलणार नसतील तर आमचेही बोलणे खुंटले आहे.
नेत्यांचा मौनम् सर्वार्थ साधनम्
आजच्या बैठकीसाठी आजी-माजी आमदार, खासदार, वस्त्रोद्योगातील जाणकार यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सायिझगधारक व कामगार प्रतिनिधी यांच्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव राहील, अशी यामागे व्यूहरचना होती. मात्र बठकीच्या तीन तासात या मंडळींनी आपला अनुभव पणाला लावून मांडणी करणेच अपेक्षित असताना त्यांनी चकार शब्दही काढला नसल्याने नेत्यांच्या मौनम् सर्वार्थ साधनम् भूमिकेची चर्चा होत आहे.